आपलं शहर

Corona Vaccination : लसीकरणासाठी मुलीला अमेरिकेत पाठवावं का? मुंबई उच्च न्यायालयात याचिका

मुंबईतील एका जोडप्याने आपल्या अल्पवयीन मुलीच्या लसीकरणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Corona vaccination: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वात जास्त धोका आहे. त्याचबरोबर भारत सरकारने 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना अजूनही कोरोनाची लस देण्याची परवानगी दिलेली नाही. त्यातच अनेक लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे.

महाराष्ट्रात 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना कोरोनाची लस देत नसल्याने, मुंबईतील एका जोडप्याने आपल्या अल्पवयीन मुलीच्या लसीकरणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की, त्यांना त्यांच्या मुलीला कोरोनाची लस देण्याकरिता अमेरिकेला पाठवायचे आहे.

हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला या विषयावर उत्तर देण्यास सांगितले.
सौम्याचे आई-वडील जन्मात: अमेरिकेचे नागरिक असल्याने त्यांनी मुंबईतील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुलीला कोरोना लसीकरणासाठी अमेरिकेत पाठवायचे आहे, असे त्यांनी याचिकेत सांगितले आहे. ही मुलगी सध्या 11वीत शिकत असून हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला या विषयावर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.(Since the girl wanted to be sent to the United States for corona vaccination, the parents filed a petition in the High Court)

कुटुंबातील इतर सदस्यांना कायदेशीर पालक बनवण्याची मागणी.
न्यायमूर्ती अभय आणि एस एस शिंदे यांनी मंगळवारी सरकारला एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्या मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी अमेरिकेत जाण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कायदेशीर पालक बनवण्याची मागणी केली आहे.(Demand for legal guardianship of other family members)

मुलीचे आई-वडील तिच्याबरोबर का जाऊ शकत नाही?
सौम्याच्या आईवडिलांनी असे सांगितले की, इतर परिस्थितीत कायम आम्ही सौम्या बरोबर असतो. परंतु सौम्याचे आजोबा नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. म्हणून त्यांना काही दिवस आराम करण्यासाठी सांगितले असल्याने आम्ही अमेरिकेला जाऊ शकत नाही. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना कायदेशीर पालक म्हणून पाठवावे यासाठी आम्ही याचिका दाखल केली आहे.(Why can’t the girl’s parents go with the girl?)

अमेरिकेत 12 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणाची परवानगी
या कुटुंबाचे वकील डॉ. मिलिंद साठे यांनी कोर्टात असे सांगितले की, सौम्या 14 वर्षाची मुलगी असल्याने तिला तिच्याबरोबर कुटुंबातील सदस्य असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर याचिकेत असे देखील सांगितले की, अमेरिकेत 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लसीकरण करण्याची परवानगी दिली गेली आहे. तर भारत सरकारने फक्त 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर सौम्या जन्मतः अमेरिकन असल्याने तिच्याकडे ओसीआई कार्ड देखील आहे. त्यामुळे ती अमेरिकेत लस घेऊ शकते.(All citizens over the age of 12 in the United States are allowed to be vaccinated)

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments