फेमस

Sonu Sood Help : सोनू सूदची मदत, विना तिकीट बिहार ते मुंबईपर्यंतचा प्रवास, पाहा संपूर्ण किस्सा..

मागील काही दिवसांपासून अनेक लोक मदतीसाठी थेट मुंबईतील सोनू सूदच्या घरी जातात आणि सोनू कुणालाही निराश करून आपल्या घरातून परत पाठवत नाही.

Sonu Sood help: कोरोनाच्या (covid-19) साथीमुळे देशभरातील प्रत्येक गरजूंसाठी एक आशेचा किरण बनलेल्या बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा (Sonu sood) दररोज एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.

गेल्या काही दिवसांपासून अनेक लोक थेट सोनू सूदच्या मुंबईतील घरी जाऊन मदतीची याचना करीत होते,परंतू यामुळे सोनूला अजिबात वाईट वाटले नाही तसेच मदतीसाठी येणार्‍या कोणत्याही माणसाला सोनुने निराश होऊन परत पाठवले नाही.

आता सोनूचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे बिहारमधील एक कुटुंब सोनूची मदत घेण्यासाठी मुंबईला पोहोचले, तेही विनातिकीट. तरीदेखील सोनुने त्यांच्याशी बराच वेळ संवाद साधला आणि त्यांची स्थितीदेखील विचारली, त्यानंतर सोनूने त्याला कमवू शकण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा घेऊन दिली. याशिवाय सिमकार्ड, एक मोबाइल फोन दिला आणि घरी परत जाण्यासाठी तिकिटही घेऊन दिले. म्हणून आता सिनेमातील हिरोपासून सोनू लोकांसाठी एक खरा नायक बनला आहे. (Real hero Sonu sood)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हेच कारण आहे की अनेकांनी सोनूला देवाचा दर्जाही दिला आहे. जेव्हा गरजू लोक सर्व बाजूंनी निराश होतात तेव्हा ते सोनू सूदकडे मदतीसाठी याचना करतात. सोनु प्रत्येक गरजू व्यक्तीच्या आशा पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. (Sonu does his best to fulfill the hopes of every needy person.)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments