फेमस

Sonu Sood Look : सोनूचा किल्लर लूक, चाहत्यांनीही लावला काळा टिळा.

सोनूला देशभरातून खूप प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे.

Sonu Sood Look :लॉकडाऊनच्या काळात लोकांना केलेल्या मदतीमुळे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) देशभरात ‘मसींहा’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. सोनूला देशभरातून खूप प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. सोनू सूद इतरांच्या मदतीसाठी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहतो, पण यादरम्यान सोनू सूदने आपले काही जुने फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहत्यांनी हे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली आहे.

सोनूला जुने दिवस आठवले

सोनू सूदने शेअर केलेले फोटो मुंबईतील आहेत, जेव्हा ते मॉडेलिंग करायचे. सोनू सूदचे थ्रोबॅक फोटो चाहत्यांना खूप आवडते आहे आणि अनेकजणांनीही कमेंट केल्या आहेत. त्याचवेळी ए का चाहत्यानेतर भन्नाट कमेंट केली आहे. भाऊला, कुणाचीच नजर लागायला नको, अशा कमेंटमध्ये सोनूवरील प्रेम व्यक्त केले आहे.

सोनू सूदचा लूक

सोनूने या फोटोमध्ये जीन्ससह लांब कोट घातला आहे. तसेच एका फोटोमध्ये जिथे तो भिंतीच्या विरुद्ध पोज देत तर दुसर्‍या फोटोमध्ये तो फोन धरून पोज करत आहे. या फोटोशूटमध्ये सोनू सूदचा लूक थोडा वेगळा दिसत आहे.

कव्हर पेजवर सोनू

सोनू सूदने आपल्या ट्विटर हँडलवर स्टारडस्ट कव्हर पेजवर एक फोटो शेअर केला होता, ज्यात तो वेगळीच पोज देताना दिसत आहे. फोटो शेअर करताना सोनूने म्हटले आहे की ‘तो दिवस होता जेव्हा मी स्टारडस्टच्या ऑडिशनसाठी पंजाबहून माझे फोटो पाठवले होते, पण मला नाकारले गेले. स्टारडस्टच्या या सुंदर फोटोंसाठी मी त्यांना धन्यवाद देतो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments