फेमस

Sonu Sood :माझं नाव बदनाम करण्याचा कट आहे, सोनू सूदचा आरोप

Sonu Sood:अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे, की लोकांच्या मदतीसाठी आपण रात्रंदिवस एक केलं, आपले नाव बदनाम करण्याच्या उद्देशाने काही लोक आपल्याविरोधात काम करत असल्याचे म्हटले जात आहे.

Sonu Sood:‌अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे, की लोकांच्या मदतीसाठी आपण रात्रंदिवस एक केलं, आपले नाव बदनाम करण्याच्या उद्देशाने काही लोक आपल्याविरोधात काम करत असल्याचे म्हटले जात आहे.

बाजारात ऑक्सिजनसह अनेक मेडिकल किटची मोठी कमतरता असताना, सोनू सूद आणि आमदार झीशान सिद्दीकी यांना कोरोना प्रतिबंधक औषधे रेमडेसिव्हीरसारखी जीवनरक्षक औषधे कशी मिळाली, हे म्हणत सोनू सूदविरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे.

या व्यक्तींनी ही औषधे कशी मिळवली, ह्याचा तपास करण्याचे आदेश हायकोर्टाने 15 दिवसापूर्वी मुंबई पोलिसांना दिले होते.

लोकांना जेव्हा गरज होती, तेव्हा मी लोकांना औषधे देऊन लोकांचे जीव वाचवले, गरजूंना मदत केली, या प्रकरणात हायकोर्टाने हस्तक्षेप करावा अशी इच्छा आहे, अशी मागणी सोनूने केली आहे.

जेव्हा लोकांनी सतत मदतीची मागणी केली, तेव्हा मी लोकांना औषध देण्याचा निर्णय घेतला, लोकांना ही औषधे मिळू शकली नाही, कारण तेव्हा बाजारात मोठी कमतरता होती, मलाही औषध मिळवणे खूप जड गेलं,

हाय कोर्टाने मुंबई पोलिसांना तपास करण्याचा आदेश दिला आहे की हे औषध अभिनेता सोनू सुद याने कायदेशीर मिळवली की बेकायदेशीररित्या मिळवली आहेत. सोनूने सांगितले की, त्याने ही औषधे गोरेगाव, मुंबई येथील लाइफलाईन मेडिकेअर हॉस्पिटलमधून घेतली होती, जी सिप्ला नामांकित कंपनीने बनवली होती.

आपले नाव खराब करण्याच्या उद्दिष्टाने याचिका दाखल करण्यात आली आहे, असा आरोप सोनू सुदने याचिकाकरता निलेश नवलखा यांच्यावर केला आहे आणि मी स्वयंसेवी संस्था केवळ लोकांच्या मदतीसाठी चालवतो आणि माझा हेतू फक्त लोकांना मदत करण्याचा आहे, अस मत सोनुने व्यक्त केले आहे.

  1. कोर्टनेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत,या प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, सोनूला या प्रकरणात कोर्टातून किती दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments