sunny-leone-cycling:सनी लिओनीची मुंबईच्या रस्त्यांवर सायकल सवारी, चाहते म्हणाले…
sunny-leone-cycling:बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर काल रात्री मुंबईच्या रस्त्यावर सायकल सवारीचा आनंद घेत होते

sunny-leone-cycling : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर काल रात्री मुंबईच्या रस्त्यावर सायकल सवारीचा आनंद घेत होते. या दरम्यान ते दोघे फोटोग्राफर्सला स्पॉट झाले. सनी आणि डॅनियल आजकाल आपल्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करत असतात आणि त्यासाठी ते खूप मेहनतही करताना दिसत आहेत.
सनी आणि डॅनियल यांनी 18.6 किलोमीटर सायकल चालविली. डॅनियल्सच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून ही माहिती मिळाली आहे.
सनीला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची रस्त्यावर गर्दी केली होती. कोरोनाचे नियम पाळत सनीने ही सवारी केली आहे. फेस मास्क, सॅनिटायझर अशा गोष्टी घेऊन ती सायकल चालवताना दिसती. प्रवासादरम्यान सनीची ही शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. सनी आणि डॅनियल एकमेकांवर खूप प्रेम करतात. सनी बर्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे, परंतु लवकरच ती पुन्हा दिसण्याची अपेक्षा आहे.,