आपलं शहर

मोठी बातमी, म्युकरमायकोसिसवर होणार मुंबईत शस्त्रक्रिया | Surgery on mucormycosis |

कोरोनावर उपचार शोधत असताना अशा आजारांवरही अनेक औषधोपचार सुरु झाले, वेगवेगळ्या इंजक्शनची निर्मिती होऊ लागली.

Surgery on mucormycosis कोरोनाची पहिली लाट गेल्यानंतर म्युकरमायकोसिस, ब्लॅक फंगस, व्हाईट फंगस अशा आजाारांनी तोंड वर काढलं. कोरोनावर उपचार शोधत असताना अशा आजारांवरही अनेक औषधोपचार सुरु झाले, वेगवेगळ्या इंजक्शनची निर्मिती होऊ लागली. यातच अजून एक दिलासादायक बातमी म्हणजे अंबरनाथमध्ये म्युकरमायकोसिसवर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Surgery on mucormycosis to be performed in Mumbai)

कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये ठामपणे दोन हात करणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेने थेट म्युकरमायकोसिसवर शस्त्रक्रिया करण्याची तयारी केली आहे. अशाप्रकारची शस्त्रक्रिया करणारी अंबरनाथ ही राज्यातील पहिलीच पालिका असल्याचे म्हटले जात आहे.

शहरातल्या डेंटल कॉलेजमध्ये अंबरनाथ नागरपालिकेने 600 खाटांचं कोव्हिड केअर सेंटर उभं केलंय. या सेंटरमध्ये म्युकरमायकोसिसची तपासणी करण्यासाठी एक विशेष भाग असणार आहे, या केंद्रात फक्त तपासणी नव्हे इतकंच नव्हे, तर इथेच म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर शस्त्रक्रियादेखील केली जाणार आहे. या केंद्रात कान, नाक, घसा आणि डोळे
तपासण्यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रे आणण्यात आली आहेत. त्यासाठी गरजेच्या असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही पालिका प्रशासनाने पाचारन केलं आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतरच्या इतर उपचारासाठी 15 खाटांचा स्वतंत्र विभागही पालिकेने याच कोव्हिड सेंटरमध्ये उभारला आहे.

म्युकरमायकोसिसच्या संपूर्ण शस्त्रक्रियेचा आणि पुढील उपचारांचा खर्च अंबरनाथ नगरपालिका करणार असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात म्युकरमायकोसिसला घाबरून न जाता, रुग्णांनी बिनधास्तपणे आपल्यावर उपचार करुन घ्यावा, असे आवाहनही रसाळ यांनी केले आहे.

Corona Virus:कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी BMC ची तयारी पूर्ण

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments