फेमस

Sushant Singh Rajput :सुशांत सिंहच्या मृत्यूला वर्ष पूर्ण, गुढ कायम, उषा नाडकर्णी म्हणते… .

चाहत्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे .

Sushant Singh Rajput :गेल्यावर्षी 14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यानच्या काळात सुशांतच्या मृत्यूवरुन अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मात्र, एक वर्ष उलटल्यानंतरही सुशांतच्या मृत्यूमागील गुढ उलगडले नाही. सुशांतने आत्महत्या केली होती का ती हत्या होती, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आज सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्याच्या चाहत्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

सुशांतच्या निधनाची बातमीने सा-यांनाच मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या निधनाला आता वर्ष व्हायला आले तरीही त्याचे मृत्युचे गुढ आजही कायम आहे. सुशांतच्या जवळच्या काही कलाकारांनीही अनेकदा त्याच्या मृत्युचे कारण आत्महत्या असूच शकत नसल्याचे सांगितले होते. कारण तो हार मानणारा अभिनेता नव्हता. सुशांतने आत्महत्या करण्यासाखे टोकाचे पाऊल उचलण्याने त्याच्या कुटुंबासह इंडस्ट्रीतील कलाकरामंडळींना देखील आजही या गोष्टीवर विश्वास बसत नाही.

उषा नाडकर्णीचा सवाल :

याच निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनीदेखील वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांतबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पवित्र रिश्ता या मालिकेमुळे उषा नाडकर्णींशी सुशांतची चांगलीच जवळीक होता. पवित्र रिश्ता मालिकेच्यावेळी सुशांतचे वय अवघे 23- 24 असावे. अतिशय मनमौजी असा तो होता. सेटवरही सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचा. नेहमी तो मला बोलायचा. ताई मुंबईमध्ये आपले घर घेण्याचे स्वप्न आहे. मुंबईत घर घेण्यासाठी खूप पैसे लागतात, असे मी त्याला म्हणायची. सुशांत यावर नेहमी म्हणायचा. करेंगे ताई कुछ तो, पर अपना भी घर होगा. त्याला इंडस्ट्रीत पुढे काय करायचे आहे, याचे त्याच्याकडे प्लॅनिंग होते, असं मत नाडकर्णी यांनी मांडलं आहे.

सुशांत आत्महत्या करु शकतो यावर विश्वास नसल्याचे उषा नाडकर्णी यांनी सांगितले. आजही माझं मनं सांगतंय त्याची हत्याच झाली असणार, असंही म्हणायला उषा नाडकर्णी विसरल्या नाहीत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments