Sushant sinh rajput case :सुशांत सिंग राजपूतच्या मित्राने लग्नासाठी मागितली जामीन, लग्नपत्रिका केली सादर
सिद्धार्थ पिठानी हैदराबाद येथून काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती

Sushant sinh rajput case:बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग्जबाबत त्याचा रूममेट सिद्धार्थ पिठानी हैदराबाद येथून काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. मात्र आता सिद्धार्थने स्वतःच्या लग्नासाठी जामीनीचा अर्ज केला आहे.
26 जून रोजी सिद्धार्थचे लग्न
न्यायालयाकडे दाखल केलेला जामीन अर्जात म्हटले आहे की 26 जून रोजी हैदराबाद येथे माझे लग्न आहे, तसेच न्यायालयाकडे लग्नाचे निमंत्रण पत्रिका सादर केली आहे. त्याचे वकील तारक सय्यद यांच्यामार्फत त्याने ही विनंती केली आहे.
सुशांतच्या घरात मदतीसाठी असलेल्या सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंतलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, कारण या दोघांच्या सांगण्यावरून सिद्धार्थ गांजा खरेदी करत असे.
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार एनडीपीएस कायद्या प्रकरणांमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर दिलेली जबानी ही कबुली जबाब मानला जाणार नाही.
जामिनाच्या अर्जात असेही म्हटले आहे की तुरुंगात पहिल्याच दिवशी ही जबानी मागे घेण्यात आली होती, तसेच आरोपपत्रातही असा एक ही पुरावा किंवा साक्षीदार नाही ज्याने सिद्धार्थवर ड्रग्सच्या तस्करीचा आरोप केला जाऊ शकतो, असा युक्तिवादही वकिलांनी केला आहे. या याचिकेवर जून 16 रोजी सुनावणी होणार आहे.