आपलं शहर

Taj hotel palace : 9 वीच्या मुलाने मुंबई पोलिसांना हादरवलं, मस्करी पडली महागात…

मुंबईतील ताज हॉटेल पॅलेसमध्ये दोन दहशतवाद्यांनी प्रवेश केलाय अशी खोटी माहिती एका अज्ञात व्यक्तींने पोलिसांना दिली.

Taj hotel palace:मुंबईत सतत अनेक घडामोडी घडत असतात.त्यातच 26/11 ला दहशतवादी हल्ला (26/11 Mumbai Terror Attack) झालेल्या मुंबईतील ताज हॉटेल पॅलेसमध्ये (Taj Hotel Palace Mumbai) पुन्हा एकदा दोन दहशतवादी बंदुक घेऊन घुसले आहेत.अशी माहिती तेथील सुरक्षा रक्षकांना देण्यात आली, परंतु जेव्हा मुंबई पोलिसांनी तपास केला तेव्हा जे सत्य समोर आले ते धक्कादायक होते.

एका नववीच्या विद्यार्थ्याने पोलिसांना दिला त्रास…

मुंबईतील ताज हॉटेल पॅलेसमध्ये (Mumbai taj hotel) दोन दहशतवाद्यांनी प्रवेश केलाय अशी खोटी माहिती देणारा फोन नववीच्या एका विद्यार्थ्याने ताज हॉटेलच्या रिसेप्शनला केला. पण या खोडकरपणामुळे मुंबई पोलिसांना मात्र खूप त्रास सहन करावा लागला. अज्ञात व्यक्तीने दुपारी साडेतीन वाजता हॉटेलच्या रिसेप्शनला फोन केला आणि दोन अतिरेकी हॉटेलमध्ये घुसल्याची खोटी माहिती तेथील सुरक्षा रक्षकांना दिली,असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Taj Mahal palace: 9th grader harassed Mumbai police, there was confusion due to raillery)

ताज हॉटेलच्या रिसेप्शनला दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले आणि त्यानंतर बॉम्ब डिस्पोजल पथक आणि स्निफर कुत्र्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

संपूर्ण इमारतीची तपासणी केली आणि हॉटेलची सुरक्षा व्यवस्था देखील वाढविण्यात आली. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू करून, हा फोन कुठून आलाबद्दल चौकशी करताना त्यांना समजले, की हा फोन पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड येथील नववीच्या विद्यार्थ्याने मस्करी म्हणून केला होता, परंतु अजूनही यासंदर्भात त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments