फेमस

अभिनेत्रीने दारू ऑर्डर करताच झाली फसवणूक, आता ऐकते लोकांचे सल्ले actress was cheated

सध्या फसवेगिरीचे अनेक मार्ग निर्माण झाले आहेत, त्यामुळे ऑनलाईन, सायबर चोरींसारखे प्रकार समोर येत आहेत. त्याच्यातच प्रत्येक वेळी नवीन पद्धतींचा वापर केला जातोय.

Actress Was Cheated : सध्या फसवेगिरीचे अनेक मार्ग निर्माण झाले आहेत, त्यामुळे ऑनलाईन, सायबर चोरींसारखे प्रकार समोर येत आहेत. त्याच्यातच प्रत्येक वेळी नवीन पद्धतींचा वापर केला जातोय. अशाच एका फसवेगिरीमुळे ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींनादेखील (Actress Shabana Azmi)  याचा तोटा झाला आहे. अभिनेत्रीने ऑनलाइन पद्धतीने दारूची मागणी केली होती. मात्र त्यावेळीच त्यांची फसवणूक झाली असल्याची माहिती ट्विट करून चाहत्यांना दिली आहे. (The actress was cheated while ordering liquor)

गुरुवारी दारुचं आधी ऑनलाईन पेयमेंट केलं, मात्र पेयमेंट करूनही केलेली ऑर्डर आली नसल्याचं शबानाने म्हटलं आहे. मात्र या सगळ्यात ट्विटरवरील युजर्सनेही अभिनेत्रीला चांगलंच ट्रोल केलं आहे. काहींनीतर सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. एका युजर्सने याबद्दल माहिती दिली आहे. Google वर दारूच्या डिलेव्हरीसाठी दिलेले अनेक फोन नंबर फसवाफसवीचे असतात. त्यामुळे सगळ्यांनी सावध राहावं, तर इतरांनी त्यांना पोलीस तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे.

स्वत:ला अनुभव आल्यानंतर शबानाने आपल्या चाहत्यांनाही सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. “सावध रहा, माझी चोरांकडून फसवणूक झाली आहे. मी डिलिव्हरी होण्याआधीच ऑर्डर केलेल्या दारुचे पैसे दिले आहेत आणि जेव्हा ऑर्डर केलेली वस्तू आली नाही तेव्हा त्यांनी माझ्या कॉलचे उत्तर देणे थांबविले! अशी माहिती देत फसवणुकीसाठी वापरलेला मोबाईल नंबरही तिने शेअर केला आहे.

हजारो लोकांनी कष्टाने कमावलेला पैसा अशाप्रकारे फसवणूक करून लुटला जातोय, त्यामुळे अशा प्रकारांवर पोलिसांनी चांगलीच कारवाई करावी, अशी विनंती अनेक वापरकर्त्यांनी केली आहे. लोक फसवणुकीसाठी सर्व प्रकारच्या पद्धतींचा वापर करतात. ऑनलाईन, सायबर फसवणूक हे शब्द आता सामान्यांच्या ओळखीचे झाल्याचाही संताप अनेक युजर्सने रिट्विट करत व्यक्त केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments