आपलं शहर

Mumbai Rain Update : महाराष्ट्राची राजधानी मुंबईची झाली तुंबई तर मुंबईला आज ऑरेंज अलर्ट…

मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; तर पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता.

Mumbai Rain Update : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आणि आजूबाजच्या परिसरात पावसाने(Rain) चांगलीच एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच पावसात मुंबईची(Mumbai) तुंबई झाले आहे. अनेक वेगवेगळ्या भागात पाणी साचल्याने त्याचा परिणाम रस्ते(Road) आणि रेल्वे(Train) वाहतुकीवर झाला आहे.याच दरम्यान मुंबईसह, कोकण, पुणे आणि विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.(Mumbai Rain)

काही वेळासाठी पाऊस(Rain) बंद झाला होता पण नंतर मुंबईसह उपनगरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. लालबाग, परळ, भायखळा, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, विलेपार्ले या ठिकाणी पावसाने सकाळपासूनच हजेरी लावली होती. जिकडे पाहावे तिकडे पावसाचे पाणीच पाणी होते. मुंबई(Mumabi)आणि बाजूच्या परिसरात पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे(Train) वाहतूक बंद आहे.

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने लोकल सेवा ठप्प :

दरम्यान बुधवारी म्हणजेच नऊ जूनला (9June) पडलेल्या पहिल्याच पावसामुळे(Rain)मुंबई आणि त्याचा आसपासच्या शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दिवसभर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली मीरा-भाईंदर अशा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत होता. जोरदार पाऊस आला तर साहजिकच याचा परिणाम हा सर्वप्रथम मुंबईच्या लाईफलाईनवर म्हणजेच मुंबईच्या लोकलवर(Local Train) दिसून येतो. सतत पडलेल्या पावसामुळे ट्रॅकवरील पाणी धोक्याच्या पातळीच्या वर गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक दिवसभर स्थगित ठेवण्यात आली होती. त्याचसोबत हर्बर मार्गावरील वाहतूक देखील स्थगित होती. मात्र, मुसळधार पाऊस पडूनही पश्चिम रेल्वेवरील(Train) वाहतूक स्थगित झाली नाही. (Mumbai Local Train)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments