कारण

Reservation : मन की नाही, तर काम की बात केली, राष्ट्रवादी नेत्यांकडून मोदींचे कौतुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे मंगळवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट...

Reservation: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बातमधून’ जनतेशी संवाद साधला होता. ओबीसी आरक्षण रद्द करण्याबाबत परिषदेची सोमवारी बैठक झाली या बैठकीनंतर छगन भुजबळांनी मीडियाशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी घेतला मोफत लसींबद्दल निर्णय
छगन भुजबळ असे म्हणाले की, मोदींनी आज मन की बात नाही केली, तर काम की बात केली आहे. मन की बातमध्ये पंतप्रधानांनी मोफत लसींबद्दल निर्णय घेतला, त्याचे स्वागत आहे. असे भुजबळ म्हणाले. मोफत लसींसाठी अनेक राज्यांनी मागणी देखील केली होती.(From ‘Mann Ki Baat’, the Prime Minister took a decision about free vaccines)

आरक्षणासाठी मोदी-ठाकरे भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे मंगळवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ही बैठक सकाळी 11 वाजता नवी दिल्ली मार्गावरील पंतप्रधान निवास येथे होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र दिले होते त्याचबरोबर पंतप्रधानांची भेट घेणार असून या भेटीमध्ये मराठा आरक्षणाबाबत ते चर्चा करणार आहेत. (The Chief Minister meet with prime minister)

अनेक मुद्द्यांवर पंतप्रधानांबरोबर केली जाणार चर्चा
तीन लोकांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला जाणार असून या भेटीत मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, तौक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि जीएसटी या विषयांवर पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा केली जाणार. या बैठकीमध्ये शिष्टमंडळासोबत मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार आहेत.(Discussions will be held with the Prime Minister on a number of issues)

आरक्षणासाठी जन आंदोलन उभे करणार
छगन भुजबळ यांनी सांगितले की, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतले काही महत्त्वाचे मुद्दे कशा पद्धतीने मांडवे याबद्दल आजच्या बैठकीत चर्चा झाली होती. तेच मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मांडण्यात येतील त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, आरक्षणासाठी जन आंदोलन देखील उभे करू.(Maratha reservation, OBC reservation and GST will be discussed with the Prime Minister)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments