फेमस

The Family Man 2 Review : कसा आहे ‘द फॅमिली मॅन 2’ , पाहा A टू Z रिव्ह्यू, कोणाला देणार किती मार्क?

The Family Man 2 रिलीज झाली आहे.

The Family Man 2 Review :अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने प्रेक्षकांच्या मनात अशी काही छाप सोडली की, लोक आता त्याच्या दुसर्‍या सत्राची आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर ती सेरीजही येऊन पोहोचली.

‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2) अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज झाली आहे. ही अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची (Amazon Prime Video) ओरिजिनल वेब सीरीज आहे. सांगितल्याप्रमाणे ही वेब सीरीज 4 जूनला मध्यरात्री म्हणजेच 12 वाजता अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज करण्यात आली. पण अनेकांनी ज्यांना फर्स्ट नाईट, फर्स्ट शो, कसा आहे अजून पाहिलं नाही, तर आज आपण त्याबद्दलच पाहणार आहोत.

काय आहे स्टोरी?

‘द फॅमिली मॅन 2’ ची कथा श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज वाजपेयी (Manoj Vajpayee) भोवती फिरत आहे. श्रीकांतने स्वतःला कौटुंबिक माणूस म्हणून बदलण्याचा प्रयत्न करत असतो, सोबत तो आयटी कंपनीतही नोकरी करत असतो. तो इथल्या कामात स्वत: ला सावरण्याचा प्रयत्न करतो पण त्याचे मन नेहमी त्याच्या ‘टास्क’ युनिटमध्ये गुंतलेले असते. यावेळी तामिळ दहशतवादीची भर पडली असते. तसेच अभिनेत्री समांथा अक्किनेनी (Actress Samantha Akkineni) दहशतवादी ‘राजलक्ष्मी’च्या भूमिकेत दिसत आहे. या शोमध्ये अभिनेत्री प्रियामणि (Actress Priyamani) श्रीकांत तिवारीची पत्नी ‘सुचित्रा अय्यर तिवारी’ची भूमिका साकारली आहे.

देशाच्या दक्षिण भागात अतिशय शक्तिशाली आणि धोकादायक दहशतवाद्यांचा प्रभाव वाढत आहे. तामिळ अतिरेकी देशावर आक्रमण करण्याचा कट कसा करतात? त्याला पाकिस्तानचा पाठिंबा कसा मिळतो, हे संपूर्ण नियोजन थांबवण्यासाठी एनआयएकडून कसा पुढाकार घेतला जातो आणि देशावर येणारं संकट कसं थोपवलं जातं, हेच दाखवण्याचा यात प्रयत्न केला आहे

अभिनय कसा आहे?

मनोज बाजपेयी यांनी श्रीकांतची भूमिका दुग्दर्शकाला हवी तशी आणि चाहत्यांना आवडेल अशीच साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे सगळ्या स्तरातून कौतूक होत आहे. कारण संपूर्ण स्क्रीनवर ज्या प्रकारच्या परिस्थिती उद्भवते, परिस्थितींना साजेशसं असं काम मनोज यांनी ‘द फॅमिली मॅन’ मध्ये साकारण्याचा पूर्णपणे यशस्वी प्रयत्न केला आहे.

दुसरी मोठी भूमिका म्हणजे अभिनेत्री समांथा अक्किनेनीची. तामिळ आणि तेलगू इंडस्ट्रीमधील एक मोठी अभिनेत्री आहे. अभिनयाची कौशल्ये, पडद्याची उपस्थिती आणि अतुलनीय अष्टपैलुत्व या तिच्या गुणांमुळे तिने दाक्षिणात्य प्रेषकांचं मन जिंकलं आहे. तिचे चाहते बऱ्याच काळापासून तिला ओळखतात.

सामंथाने स्वतःला पूर्णपणे भूमिकेत रूपांतरित केले आहे. कुठेही तिची कमी पडलेली नाही. श्रीकांतच्या पत्नीची भूमिका शानदारपणे पार पाडणाऱ्या प्रियामणिने आपला 100 टक्के परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न केला आहे. ही सेरीज पाहताना नक्कीच तुम्हाला निराशाजनक वाटणार नाही, संपूर्ण सीरिजचा तुम्ही घरच्यांसोबत आनंद घेऊ शकता, हे नक्की

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments