Satara : कोरोनातून बरा झालेल्या तरुणाला फोनवरुन देण्यात आली त्याच्याच मृत्यूची माहिती…
साताऱ्यातील फलटणमध्ये कोरोनातून मुक्त झालेल्या तरुणाला फोनवरून देण्यात आली त्याच्याच मृत्यूची हि धक्कादायक बातमी.

Satara : साताऱ्यातील फलटणमध्ये( एक धक्कादायक घटना(Shocking event) समोर आली आहे. कोरोनातून मुक्त(Free from corona) झालेल्या तरुणाला फोनवरून देण्यात आली होती त्याच्याच मृत्यूची भयानक बातमी. कोरोनामुक्त झालेल्या तरुणाची उपचार घेत असलेल्या दवाखान्यातून त्याचं नाव मृत यादीत नोंद झाले. या सर्व प्रकारामुळे साताऱ्यातील आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभार उघड झाला आहे. ( management of health system in Satara has been exposed)
साताऱ्यातील फलटणमध्ये राहणाऱ्या मंगळवार पेठेत 20 वर्षांचा तरुण सिद्धांत भोसले(Sidhant Bhosale) याच्या मोबाईलवर तेथील आरोग्यसेविकेचा फोन आला आणि सिद्धांतचा मृत्यू झाला आहे असे सांगण्यात आले. व त्याला इतर काही आजार होता का? आणि त्याच्याबाबत अजून काही माहिती घ्यायची आहे, असं सांगण्यात आले. आणि इकडे सिद्धांत मलाच माझ्या मृत्यूची माहिती कशी काय देत आहेत असं म्हणत सिद्धांतने फोन त्याच्या आईला दिला.
या सर्व घटनेनंतर सिद्धांतची आई भडकली आणि त्यांनी फलटण येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन या संबंधित असलेल्यांशी चौकशी केली. त्यावेळ त्यांच्या मुलाचे म्हणजेच सिद्धांतचं नाव हे तेथे असलेल्या मृतांच्या यादीत 46 व्या क्रमांकावर दिसून आले. पण ज्याच्या मृत्युचं ऑडिट करायचं होतं तोच स्वत: रुग्णालयात आल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.
सिद्धांत हा 7 मे ला पॉझिटिव्ह(Positive) आला असल्याने, त्याला फलटणमधीलच भोकरे दवाखान्यात(Bhokare hospital) उपचारांसाठी नेण्यात आले होते. व त्यानंतर त्याला लगेचच पाच दिवसानंतर म्हणजे 11मे रोजी (11 may) त्याला घरी सोडले होते. पण ग्रामीण रुग्णालयातील मृतांच्या यादीत सिद्धांतची चुकीची नोंद नेमकी कशी झाली हे मात्र अद्याप कोणालाही समजले नाही.