खूप काही

Maharashtra corona Update : महाराष्ट्रात मागील 24 तासात 9361 नवे कोरोना रुग्ण…

महाराष्ट्रातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली, तर 24 तासात 9101 रुग्णांना डिस्चार्ज.

Maharashtra corona Update : महाराष्ट्रातील कोरोना(Corona) रुग्णांचा आकडा आता कमी होत असताना दिसत आहे. कारण रविवारी राज्यात काही हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. पण त्या तुलनेत सोमवारी नव्या रुग्णांमध्ये(Patients) थोडीशी घट झालेली दिसून येते. कोरोनामुक्त (Corona free) झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही थोड्याच प्रमाणत जास्त आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासात 9 हजार 361 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 9101 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आलेला आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.76 टक्के :

राज्यातील 57 लाख 19 हजार 457 रुग्ण कोरोनावरती मात करून घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.76 टक्के झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील मृत्युदर 1.97 टक्के एवढा आहे. तर राज्यात 1,32,241 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.(The patient recovery rate is 95.76%)


7 लाख 96 हजार 297 व्यक्ती होमक्वारंटाईन : 

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 95 लाख 14 हजार 858 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 95 लाख 72 हजार 781 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. सध्या राज्यात 7 लाख 96 हजार 297 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत. तर, 4 हजार 983 व्यक्ती संस्थानांमध्ये होमक्वारंटाईन आहेत.(7 lakh 96 thousand 297 persons Home Quarantine)

मुंबई कोरोना :

मुंबईत गेल्या 24 तासात 733 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. व 650 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,21,370 इतकी झालेली आहे. व त्यातील 6,88,890 रुग्णांनी कोरोनावरती मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत 15,298 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.(Mumbai corona Update)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments