खूप काही

Maharashtra corona Update : महाराष्ट्रात मागील 24 तासात 8119 नवे कोरोना रुग्ण…

महाराष्ट्रातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली, तर 24 तासात 14732 रुग्णांना डिस्चार्ज.

Maharashtra corona Update : महाराष्ट्रातील कोरोना(Corona) रुग्णांचा आकडा आता कमी होत असताना दिसत आहे. कारण रविवारी राज्यात काही हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. पण त्या तुलनेत सोमवारी नव्या रुग्णांमध्ये (Patients) थोडीशी घट झालेली दिसून येते. आणि कोरोनामुक्त (Corona free) झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही कमी आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासात 8 हजार 129 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 14732 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आलेला आहे.(The number of new corona patients in Maharashtra has decreased)

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.55 टक्के :

राज्यातील 56 लाख 54 हजार 003 रुग्ण कोरोनावरती मात करून घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.55 टक्के झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील मृत्युदर 1.9 टक्के एवढा आहे. तर राज्यात 1,41,354 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.(The patient recovery rate is 95.55%)

9 लाख 49 हजार 251 व्यक्ती होमक्वारंटाईन :

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 82 लाख 15 हजार 492 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59 लाख 17 हजार 121 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 49 हजार व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत. तर,5 हजार 957 व्यक्ती संस्थानांमध्ये होमक्वारंटाईन आहेत.(9 lakh 49 thousand 251 persons Home Quarantine)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments