आपलं शहर

Mumbai Locals :खोट्या ID च्या जिवावर लोकलने प्रवास करणाऱ्यांनो सावधान, आता QR कोड हव

सरकारने लोकल गाड्यांमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे.

Mumbai Locals :कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सामान्य प्रवाशांना मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करण्यास बंदी आहे. तरीही अनेक प्रवाशी लोकलने अवैधपमे प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे.

सरकारने लोकल गाड्यांमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे, तसेच लोकल गाड्यांमध्ये प्रवास करण्याचे नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. आधी देखील असे नियम होते, परंतु सामान्य प्रवासी बनावट ओळखपत्रांच्या मदतीने तिकीट आणि पास घेत आहेत. अशा प्रवाशांचा शोध घेऊन सरकारने आवश्यक सेवा संबंधी कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या लोकांना आवश्यक सेवेचे कर्मचारी समजले जाईल. या कर्मचाऱ्यांना अधिकृत एक कार्ड दिले जाईल. सरकारने हा कडक निर्णय घेतला आहे.(this is being done to check the use of fake identity cards to travel by trains ).

राज्य सरकारचे पत्र रेल्वे विभागाला :
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची परिस्थिती पाहता सरकारने कडक नियम लागू केले आहेत. त्यातच मुंबई लोकलने लाखो प्रवासी प्रवास करतात, यामुळे तिथे संसर्ग वाढू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

मुंबईत खाजगी रुग्णालयांमध्ये 56 हजार कर्मचारी, महानगर राज्यश्री जोडलेल्या शहरांमध्ये 45 ते 50 हजार कर्मचारी आहेत. या सर्वांना आयडी कार्ड दिले जाईल. अशा कर्मचाऱ्यांना फोनवर एक क्यूआर कोड दिला जाईल. हा क्यूआर कोड तिकीट घरावर दाखवल्यास ट्रेन तिकीट किंवा पास मिळेल. ही प्रक्रिया 15 दिवसांच्या आत पूर्ण होईल.( QR code printed on the card cab be scanned through any smartmobile phone using ant QR code reader, and  it will disply whether the pass is authentic or not .)

सर्वेनुसार मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये 18 लाख आणि पश्चिम रेल्वेच्या ट्रेनमध्ये 11 ते 12 लाख प्रवासी स्थलांतरित करतात. यात तील 50% प्रवासी बनावट पास आयडी कार्ड तिकीट वापरत असल्याचे राज्य सरकारला संशय आहे.
एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेमध्ये सामान्य प्रवाशांकडून तीन लाख 70 हजार रुपये तर मध्य रेल्वेमध्ये 3 लाख 51 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

हे सर्व पाहता राज्य सरकारने लोकल ट्रेनचा प्रवास करणाऱ्यांसाठी कडक नियम लागू केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments