कारण

10 वीची परीक्षा रद्द, मात्र 11वीसाठी होणार परीक्षा, भरावी लगणार फी, वाचा संपूर्ण आदेश 11th standard admission

राज्यात कोरोनाची परिस्थिती वाढत असल्याने 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, त्याच परीक्षांच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

11th standard admission राज्यात कोरोनाची परिस्थिती वाढत असल्याने 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, त्याच परीक्षांच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्याच्या शिक्षणंमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. इयत्ता 10 वीच्या निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर अंतर्गत मूल्यमापन होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे, ही गोष्ट लक्षात घेता इयत्ता 11 वी प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येणार आहे. येत्या जुलै 2021 महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट 2021 महिन्याच्या पहिला आठवड्यात ही परीक्षा घेतली जाईल, अशी घोषणा वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. (There will be CET exam for 11th standard admission, what are the terms and conditions?)

काय आहे आदेशात

2021 – 22 च्या इयत्ता 11 प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामायीक प्रवेश परीक्षेंबाबत निर्णय

दिनांक 28 मे 2021 रोजीच्या प्रस्तावनेत कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च 2021 पासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढू लागला. या परिस्थितीमुळे इयत्ता 10 वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच परीक्षेसंदर्भातील सर्व घटकांचे हित लक्षात घेऊन माननिय मत्रिमंडळाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

” सन 2020 – 21 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता 10 वी ) रद्द करण्यात यावी, तसेच इयत्ता 10 वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट इयत्ता 11 वीमध्ये प्रवेश देण्यात यावा, या निर्णयाच्या अनुषंगाने, इयत्ता 10 वीची परीक्षा रद्द करण्याबाबत दिनांक 12 मे 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

इयत्ता 10 वीची परीक्षा रद्द केल्यामुळे सन 2021 – 22 या वर्षासाठी इयत्ता 11 वी प्रवेशासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये कार्यपध्दती विहीत करण्यात आली आहे. त्यानुसार इयत्ता 11 वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

सदर सामाईक प्रवेश परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, यास्तव अधिक खुलासा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याअनुषंगाने इयत्ता 11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेबाबत (CET) खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

01. सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्यासाठी, शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येत आहे.

02. इयत्ता 11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळांच्या (राज्य मंडळ, C.B.S.E., C.I.S.C.E., सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे, इत्यादी) विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येईल.

03. इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असेल.

04. सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इयत्ता 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. सदर परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असतील. परीक्षा O.M.R. आधारीत असेल

05. सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका / पेपर असेल आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.

06 सामाईक प्रवेश परीक्षा, आयुक्त शिक्षण यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ / परीक्षा परिषदेमार्फत घोषीत करण्यात येईल

07. इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असल्याने इयत्ता 10 वीचा निकाल लागल्यानंतर राज्य मंडळ / परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय (option) उपलब्ध करुन देण्यात येईल

08. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 10 वीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने अशा विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. मात्र C.B.S.E., C.I.S.C.E., सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे, इत्यादी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून / परीक्षा परिषदेकडून विहित करण्यात येणारे शुल्क अदा करावे लागेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments