फेमस

Lalbag Art School : लालबाग येथील गुरूकुल स्कुल ऑफ आर्ट राबवत आहेत हा अनोखा उपक्रम…

छत्र्यांवर कोरोनाविषयक संदेश रेखाटून गुरूकुल स्कुल ऑफ आर्ट करत आहेत जनजागृती.

Lalbag Art School : लालबाग येथील गुरुकुल स्कुल ऑफ आर्ट नेहमीच जन सामान्यांमध्ये चित्रांच्या माध्यमातून जनजागृती घडवून आणत असते. तसेच यावेळी पावसाळ्याच्या (Rainy season) या सीझनमध्ये एक अनोखी शक्कल लढवली आहे. पावसाळी छत्रीवर रंगरंगोटी करून त्यावर अनेक विविध प्रकारचे सामाजिक संदेश लिहून जनजागृती करण्यासाठीचा उपक्रम गुरुकुल स्कुल ऑफ आर्टचे शिक्षक पृथ्वीराज कांबळे व सागर कांबळे यांनी हाती घेतला आहे. तसेच देश मुक्त कोरोना, पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा द्या, बाहेर जाताना मास्कचा वापर करा,घरी रहा सुरक्षित रहा, वेळोवेळी हात धुवा, इत्यांदी प्रकारचे संदेश वेगवेगळ्या छत्र्यांवर रेखाटून जनजागृती करत आहेत.(Gurukul School of Art at Lalbagh)

आपण पाहत आहोत की गेल्या पंधरा महिन्यांपासून संपूर्ण देश कोरोनाशी झुंजत आहे. समाजात अनेक ठिकाणी कोरोना विषाणूविषयी जनजागृती करून नागरिकांमध्ये सावधगिरी बाळगणे याविषयीचे उपक्रम अनेक ठिकाणी घेतले जातात. त्याचप्रमाणे लालबाग येथील गुरुकुल स्कूल ऑफ आर्टचे शिक्षक पृथ्वीराज कांबळे व सागर कांबळे यांनी वेगळाच उपक्रम हाती घेत याविषयी जनजागृती केली आहे. मान्सून हा महाराष्ट्रात दाखल झाला आहे काही दिवसातच मुंबईत देखील पावसाच्या सरी बरसतील. तरी आता सर्वांना बाहेर जाताना छत्री ची गरज लागणार आहे. याच छत्री चा वापर करून लालबाग येथील गुरुकुल ऑफ आर्ट्स या कला शाळेने छत्रीच्या माध्यमातून कोरोनविषयी संदेश यावरती लिहून जनजागृती सुरू केली आहे.

कोरोना जेव्हापासून इंडियात आला आहे तेव्हापाूनच गुरुकुल ही संस्था लोकांमध्ये जनजागृती करत आहे. या कलेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे सामाजिक संदेश त्यांनी दिले आहेत. तसेच कोरोना काळात काम करणाऱ्या मंत्र्यांना कोरूना झाला तेव्हा देखील या मंत्र्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून त्यांचे पोर्ट्रेट चित्र काढून या अकॅडमी कडून प्रार्थना करण्यात येत होती. केवळ कोरोनाचीच जनजागृती न्हवे तर आतापर्यंत देशात ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या त्या प्रत्येक गोष्टीची जनजागृती या शाखेकडून केली जात असल्याचे समजते.

जवान सीमेवरती लढत असताना त्यांचे ध्येय कशाप्रकारे वाढवले जाईल याबाबत देखील जनजागृती याठिकाणी केली जाते, याबाबतची संपूर्ण दखल केंद्राकडून व आंतरराष्ट्रीय दर्जा वर घेतली गेली आहे. परंतु राज्य सरकारकडून याची कोणतीही दखल घेतली जात नाही अशी खंत चित्रकार पृथ्वीराज कांबळे यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments