आपलं शहर

Upcoming BMC election : मुंबई पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला, वाचा संपूर्ण कार्यपद्धती…

देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला आहे.

Upcoming BMC election : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला आहे. येत्या 2022 मध्ये ही निवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला (State Election Commission) दिले आहेत. अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. (Mumbai Municipal Corporation elections will be held in 2022)

राज्य निवडणूक आयोगाची माहिती

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मुंबई पालिकेने (Mumbai Municipal Corporation – BMC) यश मिळवलं असलं तरी तिसऱ्या लाटेबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीदेखील तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे, तिसऱ्या लाटेसाठी मुंबई पालिकेसह राज्य सरकारनेही तयारी सुरु केली आहे, त्यामुळे निवडणुकीच्या कार्यकाळात जर कोरोनाची तिसरी लाट आली तर परिस्थितीप्रमाणे राज्य सरकार
निवडणुकीबाबत विचार करेल, असंही राज्य निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. मार्च 2022 मध्ये ही निवडणूक होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (State Election Commission Information)

महापौरांची माहिती

2011 मध्ये झालेल्या जनगनणेनुसार पालिकेच्या वार्डांची पुनर्रचना करून निवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. मुंबईतील कोरोना परिस्थितीसह इतर प्रश्नांवर बोलण्यासाठी किशोरी पेडणेकरांनी पत्रकार परिषद बोलवली होती, त्यावेळेस त्यांनी ही माहिती दिली. कोरोना अपडेट, लसीकरण, दुकानं उघडण्याबाबतची भूमिका, व्यापाऱ्यांच्या मागण्या, मुंबई लोकल आणि मुंबई महापालिका निवडणूक अशा सर्व प्रश्नांवर किशोरी पेडणेकरांनी सविस्तर उत्तर दिलं. (Information of Mayor Kishori Pednekar)

सध्याची राजकीय परिस्थिती

मुंबई पालिकेत 226 जागांपैकी शिवसेना 97, भाजप 83, काँग्रेस 29, राष्ट्रवादी 8, समाजवादी पक्ष 6, मनसे 1, एमआयएम 1, अभासे 1, अशी नगरसेवकांची परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरशी लागण्याची शक्यता आहे. (Political situation in Mumbai Municipality)

सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीच्या वेळीदेखील तिन्ही पक्षांमध्ये किमान-समान कार्यक्रम ठरण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेस आणि भाजपने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना या निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता आहे.

स्वबळाची भूमिका

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Mumbai Congress Bhai Jagtap) यांनी पदभार स्विकारल्यानंतर मुंबई पालिकेत स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या काँग्रेस पक्ष पालिकेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावत आहे, त्यामुळे येत्या काही काळात मुंबईत शिवसेना विरुद्ध काँग्रेस असं चित्र दिसण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेपासून दूर गेल्यानंतर भाजपनेही मुंबई पालिकेत स्वत:ची वेगळी चूल मांडण्याची भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली पालिका निवडणूक लढली जाईल, अशी घोषणाही भाजपचे नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

या सगळ्या राजकीय वादामुळे मुंबई पालिकेत पुन्हा एकदा शिवसेना आपलं वर्चस्व निर्माण करणार की नव्या पक्षाला संधी मिळणार हे पाहणे गरजेचे आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments