आपलं शहर

Vaccination update: एका दिवसात 80 लाख नागरिकांच्या लसीकरणाची नोंद

18 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे, याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Vaccination update: कोरोनाची संख्या कमी होत असल्याने, राज्यातील कडक निर्बंध आता शिथिल करण्यात येत आहेत. परंतु आता तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने, राज्यभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहेत.

18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट समोर असल्याने, लसीकरणाला वेग यावा यासाठी 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना देखील लसीकरण करता येणार, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे 18 वर्षावरील नागरिक आता लस घेऊ शकतात.(Vaccination for citizens above 18 years of age started)

काही दिवस 18 वर्षावरील नागरिकांना देखील लस देण्यात आली होती. परंतु लसींचा योग्य पुरवठा नसल्याने, 18 वयोगटावरील नागरिकांचे लसीकरण थांबवण्यात आले होते व 30 ते 44 वयोगटांच्या नागरिकांनाच लस देण्यात येत होती. परंतु राज्य सरकारने आता 18 वर्षावरील नागरिकांना देखील लस देण्याचा निर्णय घेतला आहे, याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सरकारचे आवाहन
सरकारने 18 वर्षावरील नागरिकांना लसीकरण चालू केल्यामुळे, आता 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे सर्व नागरिकांना सरकारने आवाहन केले आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्यामुळे आपापल्या जिल्ह्यातील सेंटरवरून लसीकरण करून घ्यावे, असे असे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले. मोठ्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत असल्याने राज्यातील 18 वर्षावरील नागरिकांना लस घेण्याची संधी मिळाली आहे.(Government appeals for vaccination)

एका दिवसात 85 लाख नागरिकांचे लसीकरण
संपूर्ण देशात केंद्र सरकार मार्फत 18 ते 44 या वयोगटातील लोकांना 21 जून पासून मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कालपासून हे लसीकरण सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी 85 लाख नागरिकांनी लस घेतली आहे.(Vaccination of 80 lakh citizens in one day)

पंतप्रधानांनी देखील मानले आभार
त्याचबरोबर केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली आहे. एका दिवसात 85 लाख नागरिकांचे लसीकरण झाल्याने ‘वेल डन इंडिया'(well done India) म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखिल सर्वांचे आभार मानले आहेत.(The Prime Minister also thanked)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments