Vasai-Virar :रेस्टॉरंटची ऑनलाईन फसवनूक करणं जोडप्याला आलं अंगलट
दोघांनीही अशाच प्रकारे शहरातील अनेक आस्थापनांची फसवणूक केल्याचे उघड झाले.

Vasai-Virar : वसईमधील खोटे ऑनलाइन पेमेंट करून रेस्टॉरंटची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी शनिवारी एका अल्पवयीन जोडप्याला अटक केली आहे. आपलं जेवण झाल्यानंतर खोटे ट्रान्सफर करून एक जोडपे पसार झालं होतं, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
23 जून रोजी एका जोडप्याने एका हॉटेलमध्ये 6,413 रुपयांचे जेवण जेवले होते. ते बील भरतेवेळी जोडप्याने खोट्या ऑनलाईन पेयमेंटचा वापर केला होता. दोघांनीही कर्मचाऱ्यांना बनावट ऑनलाइन पेमेंट झाल्याचा मॅसेज दाखवला, मात्र हॉटेलच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झाले नव्हते. वसईतील एका रेस्ट्रॉरंटमध्ये फसवणूक केल्याची माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कल्याण कर्पे यांना समजली, आणि लगेचच संबंधीत जोडप्याला ताब्यात घेतलं.
या चौकशी दरम्यान दोघांनीही अशाच प्रकारे शहरातील अनेक आस्थापनांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी नालासोपारा येथील रहिवासी करिना सोळंकी आणि आदर्श राय या दोघांना ताब्यात घेतले आहे.
चौकशी दरम्यान आरोपींनी शहरातील इतर रेस्टॉरंट्स, पेट्रोल पंप आणि पबची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. अधिकाऱ्याने सांगितले की, या संदर्भात भादंवि कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.