कारण

भाजपच्या विरोधात पवारांचा एल्गार, पाहा काय असेल स्ट्रॅटर्जी Sharad Pawar

तिसर्‍या आघाडीच्या बैठकांवरून पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तिसर्‍या आघाडीची चर्चा वारंवार होत आहेत.

Sharad Pawar तिसर्‍या आघाडीच्या बैठकांवरून पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तिसर्‍या आघाडीची चर्चा वारंवार होत आहेत. यावेळी महत्त्वाचा फरक म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भारतीय राजकारणातील चाणक्य आणि अनुभवी नेते मानले आहेत आणि या आघाडीचे मुख्यसुत्रधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. (Sharad Pawar’s Elgar against BJP, see what the strategy will be)

या बैठकीला इतर पक्षांचे दिग्गज नेत्यांनीही उपस्थिती लावल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र मंगळवारी (२२ जून रोजी) झालेल्या नवी दिल्लीतील बैठकीला कॉंग्रेसचे कोणतेच नेते उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

प्रशांत किशोर गेल्या दोन आठवड्यात पवारांशी तीनदा भेटले आहेत. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याने अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राष्ट्र मंचाकडून घेण्यात आलेल्या बैठकीवरून त्यांच्या भेटीशीही संबंध जोडले जात आहेत.

प्रशांत किशोर यांनी जरी शरद पवारांशी भेटीगाठी सुरु ठेवल्या असल्या तरी मंगळवारी (22 जून रोजी) झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला ते उपस्थित नव्हते, यावरून शरद पवारांना पुढे करून ते राजकीय खेळी करत असल्याचं म्हटलं जात आहे. प्रशांत किशोर हे एकेकाळी नरेंद्र मोदींसह राहुल गांधींचेही निकटवर्तीय होते. 2017 साली उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या प्रचाराचे व्यवस्थापनदेखील किशोर यांनी केलं होतं, मात्र या निवडणुकीत त्यांना फारसे यश मिळाल्याचे पाहायला मिळाले नव्हते.

प्रशांत किशोर जरी काही काळ काँग्रेसच्या बाजूने असले तरी त्यांनी आता काँग्रेसच्या काही चुका सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे काँग्रेसचे नुकसान होत आहे. कॉंग्रेसकडे सध्या मिळवण्यासारखे काही नाही. खरं तर, विरोधी पक्ष नेतृत्त्व करण्यास सक्षम नसल्याचंही त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. त्यात बाकीच्या पक्षांनी तिसऱ्या आघाडीसाठी एकत्र येणे आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा समावेश नसणे, हेदेखील तितकच नुकसानकारक ठरू शकत असल्याचं प्रशांत किशोरांनी म्हटलं आहे.

सध्य परिस्थिती कॉंग्रेसबरोबर अनेक पक्षांना युती करणे योग्य वाटणार नाही, कारण राज्यस्तरीय विचार केल्यास आप, टीआरएस, अकाली दल आणि जेडीयू, तृणमूल, शिवसेनासारखे पक्ष काँग्रेसच्या विरोधात आहेत. आता सपा आणि बसपांसारख्या पक्षांनीही काँग्रेसपासून लांब राहण्याचा विचार केल्या असल्याने ही काँग्रेससाठी कठीण वेळ असल्याचंही किशोरांनी म्हटलं आहे.

तिसर्‍या आघाडीचा प्रयोग अपयशी?

तसं पाहिल्यास तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न याआधीही झाला होता, मात्र तो आता पुन्हा करणे हे शक्य होऊ शकत नाही, त्यातच सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे हे भाजपसह काँग्रेसलाही नुकसानीचे ठरू शकते. ममता बॅनर्जी, शरद पवार, अरविंद केजरीवाल, नवीन पटनाईक, उद्धव ठाकरे यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी एकत्र येणे म्हणजे काँग्रेसला एक प्रकारे चॅलेंज देण्यासारखे ठरू शकते, असं मत प्रशांत किशोरांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments