WTC Final India vs New Zealand :भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना, थोड्याच वेळात, पाहा कुठे आणि कधी ?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन हॅम्पशायर बाऊलच्या क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार.

WTC Final India vs New Zealand: आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना बघण्यासाठी क्रिकेट प्रेमींची प्रतिक्षा काही तासातच संपणार आहे. कारण खेळाला काही वेळच बाकी आहे.आजपासून पुढचे चार दिवस क्रिकेटच्या मैदानात हा ‘कसोटी’ सामना(WTC Final 2021) खेळला जाणार आहे. जरी खेळताना पावसाने या खेळामध्ये व्यत्यय आणला तर सहाव्या दिवशी हीच टक्कर सुरु राहिल. कारण हा क्रिकेटचा महामुकाबला तसा खूपच तगडा आहे.(WTC Final India vs New Zealand)
साऊथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाऊलच्या मैदानावर खेळला जाणारा सामना जिंकण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) दोघेही आसुसलेले आहेत. तर आज दुपारी ठीक अडीज वाजता मैदानावर नाणेफेक होणार आहे. आणि टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडच्या (India vs New Zealand) या अंतिम सामन्याला तीन वाजता सुरुवात होणार आहे. (WTC Final India vs New Zealand)
“This is not just good cricket over the last seven, eight months, this is hard work and toil for the last four, five years.” 🗣
Hear what @imVkohli and Kane Williamson have to say ahead of leading their teams out in the #WTC21 Final 🆚#INDvNZ pic.twitter.com/62F3PNsqcH
— ICC (@ICC) June 18, 2021
सामना कोठे सुरू होणार?
इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन हॅम्पशायर बाऊलच्या क्रिकेट ग्राऊंडवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा हा अंतिम सामना खेळविला जाणार आहे. हा सामना भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) या दोन टीम मध्ये खेळला जाणार आहे.
या चॅनेलवर पाहा Live सामना :
आज भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना आपण स्टार स्पोर्ट्स 1(Star Sports 1) आणि स्टार स्पोर्ट्सच्या इतर चॅनेलवर (On other Star Sports channels) पाहू शकतो. या चॅनलमध्ये आपण हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीचा भरभरून आनंद लुटू शकता.