खूप काही

WTC Final :भारत WTC Final हारताच महेंद्रसिंह धोनी ट्रेंडिंगमध्ये

WTC स्पर्धेत भारताच्या पराभवानंतर अनेक क्रिकेटप्रेमींनी महेंद्रसिंग धोनीची (M. S. Dhoni) आठवण काढली.

WTC Final : जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेची अंतिम फेरी (WTC Final) 23 जून 2021 रोजी पार पडली.या अत्यंत रोमांचकारी सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) भारताचा 8 विकेटने पराभव केला.भारताच्या पराभवानंतर अनेक क्रिकेटप्रेमींनी महेंद्रसिंग धोनीची (M. S. Dhoni) आठवण काढली. (WTC Final: Mahendra Singh Dhoni is trending after India lost the WTC Final)

WTC च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला. त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींनी यावर आपली नाराजी व्यक्त केली.गेली अनेक वर्ष महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले आहेत परंतु विराट कोहलीच्या (Virat kohli) कारकिर्दीत विराटच्या नावावर खेळाडू म्हणून अनेक रेकॉर्ड्स आहेत परंतु एक उत्तम कर्णधार म्हणून कोणतीही छाप विराटने सोडलेली नाही.

न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये कोहलीला हे बदलण्याची संधी होती, पण संघ गडबडला, आणि संघाचा पराभव झाला यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीबद्दल चर्चा होत आहेत सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून धोनीच्या चाहत्यांनी त्याच्या रेकॉर्डसाठी कौतुक केले आहे.

महेंद्रसिंग धोनीने त्याच्या कारकीर्दीत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. त्याने आयसीसीच्या चार फायनल मध्ये भारताचे नेतृत्व केले होते आणि त्यातील तीन सामने जिंकले देखील होते. (Mahendra Singh Dhoni has set many records in his career)

2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवला होता त्याच बरोबर ICC चे सर्व विजेतेपद जिंकणारा धोनी जगातील पहिला कर्णधार देखील ठरला आहे.तसेच चॅम्पियन्स करंडकपूर्वी धोनीच्या नेतृत्वात 2007 मधील टी -20 विश्वचषक (2007 world cup)  आणि 2011 मधील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने बाजी मारून आपल्या नावावर केले होते.(Dhoni has also become the first captain in the world to win all ICC titles)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments