खूप काही

XII Board Exam cancelled : अखेर बारावीच्या परीक्षा रद्द, बैठकीत काय झालं, आता निकाल कसा लागणार…

अखेर मोदी सरकारने केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

XII Board Exam cancelled : अखेर मोदी सरकारने केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने अनेक मुलांना दिलासा मिळाला आहे, मात्र अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी त्यांच्या हिताचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे, त्यामुळे येत्या काळात बारावीच्या आधारावर पुढील शिक्षण घेताना अडचण येणार नाही, याची काळजी बोर्डाने घेतली आहे. (CBSE Class XII Board Exams cancelled)

देशातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी केंद्राशी पत्रव्यवहार केला होता, या पत्रात 12 वीच्या परीक्षा रद्द कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती, त्या पद्धतीनेच केंद्राच्या बोर्डाने नियोजन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. निकालाच्या संदर्भातली संपूर्ण कार्यपद्धती केंद्राच्या सोशल मीडियासह इतर माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल, विद्यार्थ्यांचं आरोग्य, त्यांची सुरक्षा आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच करिअर अशा गोष्टींना प्राधान्य दिलं जाईल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

निकाल कसा लागेल?

सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा आल्या आहेत, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे, मात्र यावरही केंद्र सरकारने आपली भूमिका मांडली आहे. निकाल जाहीर करण्यासाठी लवकरच एक कार्यपद्धती जाहीर केली जाईल, विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षा आणि करिअर या सगळ्यांचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.

देशातील विद्यार्थी, पालक यांच्यासोबतच शिक्षकांचाही संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जाईल, केंद्राकडून दिलेल्या गुणांवर जर विद्यार्थी समाधानी नसतील तरते पुन्हा आपले पेपर देऊन आपले गूण मिळवू शकतात, मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी कोणतीच सक्ती केली जाणार नाही, असं ठाम मंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीनंतर मांडलं आहे. (XII Board Exam cancelled what happened in the meeting now how will the result be)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments