आपलं शहर

MNS – BJP ALLIANCE-देवेंद्र फडणवीसांचे मनसे, भाजप युतीवर सुचक विधान, पाटलांच्या विधानाची सारवासारव

MNS - BJP ALLIANCE:सध्या नाशिक पालिका निवडणुकांचं बिगूल वाजलय, त्यामुळे अनेक पक्षातील बड्या नेत्यांनी नाशिक दौरा सुरु केला आहे,

MNS – BJP ALLIANCE: सध्या नाशिक पालिका निवडणुकांचं बिगूल वाजलय, त्यामुळे अनेक पक्षातील बड्या नेत्यांनी नाशिक दौरा सुरु केला आहे, मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे देखील नाशिकच्या 3 दिवशीय दौऱ्यावर आहेत, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनीदेखील नाशिक दौरा सुरु केला आहे. या सगळ्यात येत्या पालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजपची युती होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनीदेखील या युतीबाबत आपलं मत मांडलं आहे. नागपूर विमानतळाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. मनसे आणि भाजप युतीबाबत योग वेळी निर्णय होईल असं सूचक विधान पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे एकत्र येणार का? या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

जर मनसेने परप्रांतीयांचा मुद्दा सोडयला तयरा असेलस, तर मुंबई पालिकेमध्ये युती होण्याची शक्यता आहे, असं विधान भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केलं आहे, यावर देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.

नाशिकसह पुणे, ठाणे आणि मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे, त्यामुळे येत्या काळात पुन्हा राजकीय धुरळा उडणार आहे, मात्र या सगळ्यात मुंबई पालिकेची निवडणूक खूप महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जात आहे. शिवसेनेचा गड असलेल्या मुंबई पालिकेला भाजप, काँग्रसने स्वबळावर जिंकण्याचा अझेंडा ठरवला आहे, त्यातच मनसेनेही रणशिंग फुंकले आहे, त्यामुळे येत्या काळात मनसे आणि भाजप एकत्र येऊन निवडणुका लढण्याची शक्यता आहे.

या सगळ्यात भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडून सावधपणाची वक्तव्य आली असली, तरी मनसेकडून कोणतेची अधिकृत वक्तव्य यावर न आल्याने मनसेची काय भूमिका असणार आहे, हे पाहाणे गरजेचे असणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments