आपलं शहर

Mumbai news :मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस 26 जुलै 2005

समस्यांच्या निवारण्यासाठी महानगर पालिका अजूनही कमी पडते. 

Mumbai news :पर्यटन क्षेत्र, गरिबांची मुंबई, आर्थिक राजधानी मुंबई, चंदेरी दुनियेची मुंबई, क्रिकेट जगताची पंढरी अशी काहीशी ओळख असणारी आपली मुंबई. गेल्या काही वर्षांपासून अनेक दहशद वादी हल्ले, दंगली, पूर, आपत्कालीन दुर्घटना, धोखादायक शहर अशा प्रकारे मुंबईची ओळख बनू लागली आहे. प्रत्येक घटनेचा आयुष्यावर कमी अधिक बरा वाईट परिणाम होत असतो. पण घटनेने आयुष्याची दिशाच बदलते, आणि 26 जुलैने मुंबईची दिशा बदलली.

मुंबईसह महाराष्ट्राचा काळा दिवस 26 जुलै 2005 या दिवशी मुंबई मध्ये पावसाने हाहाकार माजवला होता. तब्बल 24 तासांमध्ये 944 मीमी पावसाची नोंद झाली होती. 100 वर्षाच्या इतिहासामध्ये ही सर्वाधिक नोंद होती. ज्यांनी 26 जुलै अनुभवला त्यांच्या आयुष्यातील ते तीन दिवस व त्याचे दूरगामी परिणाम विसरुच शकणार नाहीत. निसर्गाच्या तांडवाचा मुंबईकरांवर जबरदस्त परिणाम झाला, आणि तो प्रत्येक क्षेत्रात दिसला. प्रत्येक गोष्टीतून आपण काहीतरी शिकवण घेत असतो. पावसाळा तर नेहमीच येत असतो. त्यासोबत समस्याही ओढावून येतात. या समस्यांच्या निवारण्यासाठी महानगर पालिका अजूनही कमी पडते. (944 mm of rain was recorded in 24 hours.)

तर महानगर पालिका कुठे कमी पडते ते पाहुयात…

नाले सफाई वेळेवर केली जात नाही.

महानगर पालिकेसह राज्यसरकारचे दुर्लक्ष

मुंबईतील पाण्याचा निचरा करण्याची यंत्रणा जुनी असून तिचे आधुनिकीकरण अद्याप झालेले नाही.

मुसळधार पावसाची पूर्वसूचना दिली जाते परंतु ती सपशेल खोटी ठरते व नागरिक जागरूक नसतात.

मिठी नदी (mithi River) आणि इतर नाल्यांमधील गाळ पूर्णपणे काढला जात नाही

काळ्या यादीत समावेश असलेल्या आणि भ्रष्ट कंत्राटदारांना पुन्हा कामे दिली जातात.

प्रत्येक कंत्राट मंजूर करताना भ्रष्टाचार  होतो.

पालिका प्रशासनाकडून संपूर्ण निधी खर्च केला जात नाही.

आपल्या मुंबईला या सर्व धोक्यांपासून वाचवण्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेसह राज्यसरकारची आहे. जर पुन्हा एकदा 26 जुलै मुंबईकरांना अनुभवायचा नसेल तर पालिकेसह मुंबईकरांनीही ( Mumbai maharagarpalika )योग्य ती काळजी घेतली पाहिजे, तसेच सतर्क आणि जागरूक राहिले पाहिजे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments