आपलं शहर

7 LAKES OVERFLOW : मुंबईसाठी Good News, मोडक, सागर, तानसा तलाव भरले, हा होईल फायदा

7 LAKES OVERFLOW : मोडक-सागर तलाव आणि तानसा तलाव हा पहाटेपासून ओसंडून वाहू लागले आहेत.

7 LAKES OVERFLOW : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत दररोज 385 कोटी लीटर एवढा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या 7 तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव आणि तानसा तलाव हा पहाटेपासून ओसंडून वाहू लागले आहेत.

यानंतर मोडक-सागर तलावाचे 2 दरवाजे, तर तानसा तलावाचा 1 दरवाजा उघडण्यात आला आहे. मोडक-सागर तलाव 18 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 09:24 वाजता ओसंडून वाहू लागला होता, तर तानसा तलाव हा दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 07:05 वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता. या व्यतिरिक्त यंदाच्या वर्षी तुळशी तलाव व विहार तलाव अनुक्रमे 16 जुलै आणि 18 जुलै 2021 रोजी पूर्ण भरुन वाहू लागले आहेत. तसेच यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 4 तलाव पूर्ण भरुन वाहू लागले आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,763.3 कोटी लीटर इतकी असून यामध्ये आज पहाटे 6:00 वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार 77,9568 कोटी लीटर इतका म्हणजेच 53.86 टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. या अंतर्गत अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या दरात 4.31 टक्के अर्थात 978 कोटी लीटर भर पडली आहे, तर मोडक-सागर तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 100 टक्के अर्थात 12,892.5 कोटी लीटर भर पडली आहे. तसेच तानसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेमध्ये 99.66 टक्के अर्थातच 14,4593 कोटी लीटर पाणी साठले आहे.

‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’मध्ये पाणी साठवण क्षमतेमध्ये 47.71 टक्के अर्थात 9.234.2 कोटी पाणीसाठा झाला आहे. भातसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 51.35 टक्के अर्थात 36,818.4 कोटी लीटर भर पडली असून विहार तलावामध्ये पाणी साठा हा 100 टक्क्यांनी अर्थात 2,769.8 कोटी लीटर तर तुळशी तलावामध्ये देखील पाणी साठवण क्षमतेच्या 100 टक्क्यांनी अर्थात 804.6 कोटी लीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments