खूप काही

Goodbye Danish : एका गोळीने दानिशचा वेध घेतला आणि…

फोटोग्राफर म्हणून दानिश खूप ग्रेट तर होताच, मात्र त्याहीपेक्षा तो खूप चांगला माणूस होता,

गुडबाय दानिश !

फोटोग्राफर म्हणून दानिश खूप ग्रेट तर होताच, मात्र त्याहीपेक्षा तो खूप चांगला माणूस होता, चांगला बॉस होता.सामान्य माणूस हाच त्याच्या फोटोग्राफीचा फोकस होता.

इराक,अफगाणमधील गृहयुध्दात आणि हिंसाचारात होरपळलेली माणस, नकोश्या रोहींग्याना मिळणारी अमानूष वागणूक, दुसऱ्या कोविड लाटेत कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, वेटींगवर असलेली स्मशानभूमी, नागरीकत्व कायद्यावरुन उफाळलेला हिसांचार, द्वेष अशी मानवी मनाला अस्वस्थ करणारी कित्येक छायाचित्र दानिश सिद्दिकीच्या कॅमेऱ्याने क्लिक केली होती. रिपोर्टर ते फोटोग्राफर असा प्रवास करणाऱ्या दानिशने अनेकदा आपला जीव धोक्यात घालून आपल्या फोटोग्राफीने अस्वस्थ जगाचे वास्तव पुढे आणले.

अफगीस्तानमधील गृहयुध्दजन्य परिस्थितीचे वार्ताकन करत असतांना, एका गोळीने दानिशचा वेध घेतला. दानिश आपल्यातून निघून गेला, मात्र आयुष्यभर अस्वस्थ करणारी छायाचित्र सोडून. दानिशच्या मृत्यूच्या निमीत्ताने वाईट वागणाऱ्यांना ‘तालिबानी’ अस संबोधणाऱ्या अनेक भारतीयांचे मन खरच किती मोठे आहे, हे कळाले.

– विनोद राऊत, जेष्ठ पत्रकार

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments