फेमस

Big Breaking : अमिर खान घेणार किरणसोबत घटस्फोट, सांगितलं मोठं कारण… Aamir Khan Kiran Rao Divorce

सगळ्यांच्या आडती अमिर खान आणि किरण राव यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. पाणी फाऊंडेशन असो किंवा अनेकांना मदत करताना असो

Aamir Khan Kiran Rao Divorce  सगळ्यांच्या आडती अमिर खान आणि किरण राव यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. पाणी फाऊंडेशन असो किंवा अनेकांना मदत करताना असो. या जोडीने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र याच जोडीबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अमिर खान आणि त्याची पत्नी किरन राव हे दोघे 15 दिवस एकत्र राहिल्यानंतर घटस्फोट घेत आहेत.

या दोघांनी सध्याच एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आम्ही आमच्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहोत. आम्ही आता इथून पढे पत्नी आणि पती म्हणून एकत्र राहणार नाही, मात्र आम्ही एकमेकांचे साथीदार म्हणून नक्की एकत्र असणार आहोत. आणि आम्ही एकमेकांची फॅमिलीम्हणून एकमेकांच्या सुखदुखामध्ये नक्की राहू, असं मत त्यांनी मांडलं आहे. ANI या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

आमिरचा पहिला घटस्फोट 2002 मध्ये झाला होता तर त्याचा दुसरा घटस्फोट 2021 मध्ये होत आहे. या प्रकरणाला अनेकांनी राजकीय बाजू देण्याचाही प्रयत्न केला जातोय. त्यामुळे नेमकं यांनी घेतलेल्या या निर्णयाचं कारण त्यांनी स्वत: अजून मांडलेलं नसल्याने यावर फक्त चर्चा होत आहेत.

या 15 वर्षांमध्ये आम्ही खूप अनुभव, आनंद मिळवला. आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम आहे. मात्र आम्ही आपल्या जीवनाचा नवा प्रवास सुरू करत आहोत. यापुढे पती-पत्नी म्हणून नव्हे तर एकमेकांचे साथीदार आणि कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहू. आम्ही काही दिवसांपूर्वी या निर्णयाला सुरुवात केली होती, मात्र आता त्याची घोषणा करण्याची वेळ आली आहे. आम्ही फक्त कुटुंब म्हणून वेगळे झालो आहोत, मात्र आम्ही आमची मुलं, त्यांचे पालनपोषण, संगोपन एकत्र करणार आहोत. आम्ही चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि आम्हाला आवडत असलेल्या सगळ्या गोष्टी साथीदार म्हणून नक्की करत राहू. आमच्या नात्याबद्दल आणि आम्हाला समजून घेतल्याबद्दल आमच्या कुटुंबासह आणि मित्रांचे खूप आभार आणि ज्यांच्याशिवाय आमचं आयुष्य पूर्ण होत नाही, अशा चाहत्यांनाही आमचे धन्यवाद आणि हा जरी घटस्फोट असला तरी आमच्या आयुष्याची ही नवी सुरुवात असेल, असही मत अमिर खान आणि किरण राव यांनी लिहलेल्या एका पत्रात म्हटलं आहेत.

Image

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments