फेमस

Aamir Khan Kiran Rao Divorce : घटस्फोटही नव्या गोष्टीची सुरुवात आहे, वाचा अमिर-किरणच्या पत्रातील सगळे मुद्दे…

सुपरस्टार आमिर खान आणि निर्माता-दिग्दर्शक किरण राव यांनी शनिवारी लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेण्याच्या निर्णयाची घेतला आहे.

Aamir Khan Kiran Rao Divorce:सुपरस्टार आमिर खान आणि निर्माता-दिग्दर्शक किरण राव यांनी शनिवारी लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेण्याच्या निर्णयाची घेतला आहे. परंतू आम्ही चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांसाठी सहकार्य करणारे म्हणून काम करत राहू ज्याबद्दल आम्हाला आवड आहे. तसेच आम्ही आमचा मुलगा आझाद यांचे एकनिष्ठ पालक आहोत, ज्यांचे आम्ही पालनपोषण आणि एकत्र संगोपन करू, असं मत अमिर आणि किरण यांनी सादर केलेल्या पत्रात मांडलं आहे.20210703 135800

गेल्या पंधरा वर्षानंतर सुपरस्टार आमिर खान आणि निर्माता दिग्दर्शिका किरण राव हे एकत्र राहत आहेत. 2001 मध्ये लगान चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट झाली होती आणि 2005 मध्ये ते दोघेही लग्नबंधनात अडकले होते. एकच पत्रामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. निवेदनात त्यांनी आम्ही गेल्या पंधरा वर्षांमध्ये एकत्र राहून अनेक चांगले अनुभव सामावून घेतले आहेत, आमच्या नात्यात फक्त विश्वास, आदर आणि प्रेम वाढले आहे. परंतु आम्ही आता आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करत आहोत. आमचे आयुष्य – यापुढे नवरा-बायको म्हणून नाही, पण एकमेकांसाठी साथीदार, पालक, कुटुंब म्हणून नक्की एकत्र असू. असं मतही त्या पत्रात मांडलं आहे.20210703 135819

आम्ही आमचा मुलगा आझाद यांचे एकनिष्ठ पालक आहोत, ज्यांचे आम्ही पालनपोषण आणि एकत्र संगोपन करू. आम्ही चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांसाठी सहकार्य करत राहू. ज्या गोष्टी आम्हाला आवडतात, ती कामं एकत्र करत राहू. आमच्या नात्यामधील गोष्टी समजून घेतल्याबद्दल कुटुंबियांचे आणि मित्रांचे आभार देखील या दोघांनी आपल्या पत्रात माणले आहे.20210703 135715

आमाचा घटस्फोट झाला म्हणजे आम्ही सर्व काही संपवत आहे, असं नाही. एक नवीन सुरुवात झाल्याचे हे संकेत आहेत. आमच्या पुढील वाटटचालीस तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाची गरज आहे, आमच्याप्रमाणेच तुम्हालाही हा घटस्फोट शेवटच्या रूपात दिसणार नाही, तर एका नव्या गोष्टीची सुरुवात असेल, अतं मतही दोघांनी त्या पत्रात मांडलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments