आपलं शहर

Air India:एयर इंडिया करणार प्रॉपर्टीचा लिलाव, मुंबईकरांना फायदा

Air India:कर्जात बुडलेल्या एअर इंडिया परत एकदा आपल्या संपत्तीची विक्री करणार आहे,

Air India:कर्जात बुडलेल्या एअर इंडिया परत एकदा आपल्या संपत्तीची विक्री करणार आहे, यामध्ये काही संपत्तीची राखीव किंमत कमी करून त्यांचा पुन्हा लिलाव केला जाईल. यामधून कंपनी आपला तोटा भरण्याचा प्रयत्न करणार आहे, तर त्याचवेळी कंपनीच्या या ऑफरमुळे दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये घराचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. तुम्ही स्वस्तात आलिशान फ्लॅट खरेदी करू शकता, या साठी 8 आणि 9 जुलैला ऑनलाईन बोली लावण्यात येणार आहे.

एयर इंडिया देशातल्या 10 मोठ्या शहरांमध्ये निवासी प्रभागातील आपल्या प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. यासाठी कंपनीने ई-नीलामी (Online Auction) आयोजित केली आहे, एयर इंडियाने यातून 2500-300 कोटी रुपये जमव्याची योजना बनवली आहे. मनी कंट्रोलच्या बातमीनुसार 13.3 लाख रुपये पासून नीलामी सुरु होणार आहे.

एयर इंडियाचा नोटीसनुसार मुंबईमध्ये निवासी भूखंड आणि फ्लॅट्स, नवी दिल्लीत पाच फ्लॅट्स, बंगळुरूमध्ये एक निवासी प्लॉट आणि कोलकाता येथे चार फ्लॅट आहेत. कंपनी या सर्व मालमत्तांची विक्री करेल. त्याचप्रमाणे औरंगाबादमधील बुकिंग कार्यालय आणि स्टाफ क्वार्टर, नाशिकमधील फ्लॅट्स, नागपुरातील बुकिंग कार्यालय, एअरलाइन्स हाऊस आणि भुजमधील एक निवासी भूखंड व तिरुअनंतपुरम मधील एक निवासी भूखंड लिलावासाठी उपलब्ध आहेत. यापूर्वीच्या अनेक वेळा या लिलावाच्या स्लॉटमध्ये अशा अनेक मालमत्ता ठेवल्या गेल्या होत्या.

माध्यमांच्या दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की निवडलेल्या मालमत्तांमध्ये विशेषत: टायर 1 शहरांमध्ये फ्लॅट खरेदी करण्यावर 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकेल. कारण येथे राखीव किंमत कमी करण्यात आली आहे. लिलावासाठी ठेवण्यात येणारी मालमत्ता निवासी आणि व्यावसायिक दोन्ही असतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments