Ajit pawar : अजित पवार भडकले; ‘जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला येतात का नुकसान पहायला?’
मुख्यमंत्री यांच्याबाबत वक्तव्य करताना एवढ्या खालच्या थराची भाषा कधीही, कोणीही वापरली नव्हती,असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्रात झाले. मात्र अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्या पक्षातील नेत्यांनी कधीही वापरली नाही, असे विधानहू अजित पवारांनी केलं आहे.

Ajit pawar : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पूरग्रस्त चिपळूण भागात दौरा केला होता, त्यावेळी जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित नसल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे संतापलेल्याचे व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहेत.
त्यावेळी जिल्हाधिकारी यांना फोन करून तुम्ही उपस्थित का नाहीत, असा सवाल उपस्थित केला होता, मात्र जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात उपस्थित असल्याचं म्हटलं होतं, त्यावरून नारायण राणे यांनी “तो सीएम काय बीएम गेला उडत, आम्हाला कुणाचही नाव सांगू नका” अशी भाषा वापरली होती.
यासंदर्भात आता अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे, “प्रत्येकाला दौरा करण्याचा अधिकार आहे, मात्र व्हीआयपी व्यक्तींनी कलेक्टर पाहिजे, अधिकारी पाहिजे असा आग्रह धरू नये, जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना काम करण्याची मुभा मिळायला हवी, इतर नेत्यांना दौरा करण्याचा अधिकार आहे, त्यासाठी आम्ही आता नोडल ऑफिसर ठेवणार आहोत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याबाबत वक्तव्य करताना एवढ्या खालच्या थराची भाषा कधीही, कोणीही वापरली नव्हती,असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.
यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्रात झाले. मात्र अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्या पक्षातील नेत्यांनी कधीही वापरली नाही, असे विधानहू अजित पवारांनी केलं आहे.
पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, आम्हीदेखील विरोधी पक्षात असताना दौरे केले, मात्र त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहेत, तहसीलदार कुठे आहेत, प्रांत कुठे गेले, याची विचारणा करत बसलो नाही. काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.