खूप काही

Amazon India :लहान उद्योजकांना मोठी संधी, ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा

ॲमेझॉन इंडिया यांनी ॲमेझॉन स्मॉल बिजनेस डे 2021 ची घोषणा केली आहे.

Amazon India : कोरोना काळात अनेक व्यावसायिकांचे नुकसान झालेआहे तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बंद पडलेला व्यवसाय यांना पाठिंबा देण्याचे प्रोत्साहन ‘ॲमेझॉन प्राईम ‘ (Amazon prime ) यांनी सुरू केली आहे. (Amazon India has announced Amazon Small Business Day 2021.)

ॲमेझॉन इंडिया यांनी ॲमेझॉन स्मॉल बिजनेस डे 2021 ची घोषणा केली आहे. 2 जुलैच्या मध्यरात्री ते 4 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत ही योजना सुरू राहिल. कोरोना काळात अनेक कठीण प्रसंग निर्माण झालेत. आरोग्यसेवा असो किंवा छोटा व मोठा व्यवसाय असो. या सर्वांवरच परिणाम झाला आहे, या सर्व गोष्टी सुरळीत होण्याच्या मार्गावर असून व्यापारी एकमेकांना पाठिंबा देण्याचे काम करत आहे .

ॲमेझॉन प्राईम यांनी जाहीर केलेल्या ‘ॲमेझॉन स्मॉल बिजनेस डे ‘ हा 3 दिवसात ऑनलाइन खरेदी, विक्री कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट उत्पादनाच्या विविध आणि विशिष्ट निवडीमध्ये ग्राहकांची मागणी पूर्ण करेल. अशी उत्पादने लाखो विक्रेते, उत्पादक, स्टारबक्स आणि ब्रँड महिला उद्योजक, कारागीर ,विणकर आणि स्थानिक दुकानदारांना देत आहेत. तर दुसरीकडे या कार्यक्रमादरम्यान खरेदी केल्या आपल्याला अनेक ऑफर शोधण्याची ,वस्तू खरेदी करण्याची, लाखो व्यापाऱ्यांना मदत करण्याची संधी देखील मिळेल. या विक्री कार्यक्रमात रोगप्रतिकारशक्‍ती बूट उत्पादन, मान्सूनची आवश्यक वस्तू, होम फिटनेस उपकरणे तसेच हस्तकला, बाजारातील विशेष थीम असलेले स्टोअर्स इत्यादी उपलब्ध असतील.

एखादी वस्तू खरेदी करायची असल्यास आपण येथे सहभाग घेऊन केलेल्या वस्तूचे पैसे ऍमेझॉन पे किंवा इतर डिजिटल पेमेंट सिस्टम चा वापर केल्यास 10% कॅशबॅक मिळेल. 2020 मध्ये सर्व देशभरात पसरलेल्या कोरोना आजारामुळे लॉकडाउन जाहीर केला. यात लहान व्यवसायिकांना खूप त्रास सहन करावा लागला आहे.

गेल्या वर्षीदेखील ॲमेझॉन इंडियाने स्मॉल बिजनेस 2020 चे आयोजन केले होते, हजारो छोट्या व्यवसायिकांना याची मदत झाली. जयपूर मधील स्थानिक हस्तकला ब्रांड सिझन क्रिएशन विषयी बोलताना ‘मालिका अर्चना कुमावत ‘यांचा अनुभव शेअर केला होता. “गेल्या वर्षी आम्ही एका महिन्यात संपूर्ण महिन्यासाठी व्यवसाय केला आमच्या ब्लॉग छापील कृतीसाठी चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे 2020 मध्ये लघु व्यवसायांना मोठा फायदा झाला.

‘ऐसिलिसिया सौझा’ लाईफस्टाईल ब्रँडचे मालक सौरभ शर्मा म्हणाले “मागच्या वर्षी कोरून आला तरीदेखील आम्ही त्या दरम्यान लोकांच्या ही व्यवसायामध्ये चारपट वाढ पाहिली होती. या माध्यमातून आम्ही बऱ्याच ग्राहकांपर्यंत पोहोचलो आहोत”. केवळ अर्चना आणि सौरभ यांच्यासारखे असेच लाखो अनेक लघु व्यवसाय मालक आहेत ज्यांना ॲमेझॉन इंडियावर पूर्ण विश्वास आहे.

लॉकडाऊन दरम्यान झालेल्या नुकसानीपासून मदत करण्यासाठी ॲमेझॉन इंडियाने पुढाकार घेतला आहे. ॲमेझॉन इंडिया स्मॉल बिजनेस यांनी राज्यात 2020- 2021 मध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments