फेमस

Amir khan and kiran rao divorced : लहान वयातच झालं होतं अमिरला पहिलं प्रेम, घरच्यांना न सांगताच केलं होतं लग्न

Amir khan and kiran rao divorced : बॉलिवूड सुपरस्टारची लव्ह लाइफ खूप मनोरंजक असते. आमिर खान आणि किरण राव यांच्यामध्ये आता घटस्फोट झाला आहे..

Amir khan and kiran rao divorced :  बॉलिवूड सुपरस्टारची लव्ह लाइफ खूप मनोरंजक असते. आमिर खान आणि किरण राव यांच्यामध्ये आता घटस्फोट झाला आहे. त्या दोगांनी तशी घोषणाही केली आहे, मात्र आज आपण पाहणार आहोत अमिरच्या पहिल्या लग्नाचा किस्सा जो तुम्ही कधी वाचलाही नसेल. अमिर खानचं पहिलं लग्न रिना दत्ताशी लग्न झालं होतं. दोघांचीही लव्ह स्टोरी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. रिना आमिरची शेजारी राहायची आणि या कारणास्तव त्या दोघांमध्ये मैत्री वाढत गेली.

ba14f429da5b13ee789e023eba5e806318877

आमिर खानने कुटूंबाला न सांगता शेजारी राहणाऱ्या रिना दत्तासोबत लग्न केले होते, त्यानंतर 2002मध्ये तब्बल 16 वर्षांनी त्यांच्या नात्यात फूट पडली आणि त्यांचा घटस्फोट झाला.

4acb11946d0f2a7f1fa61785c994a1ff6c0eb

आमिर-रिना जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा त्यांचे वय कमी होते. आमिर 20 वर्षांचा होता आणि रिना 18 वर्षांची होती. आमिरला त्याचवेळी रीनाशी लग्न करायचं होते, पण लग्नासाठी घरच्यांची परवानगी मिळेपर्यंत त्यांना थांबावं लागलं होतं.

39b74cb0d84839e63a4abd9e54825f572927b

अमीर 21 वर्षाचा होताच त्याने घरच्यांना न सांगता रिनाशी लग्न केले, दोघांनी कोर्टमध्ये जाऊन लग्न केले आणि आपाल्या घरी आले, काही दिवसांनंतर रिनाच्या बहिणीला यांच्या लग्नाची माहिती समजली, तेव्हा तिने रिनाला धमकी देण्यास सुरुवात केली, जर घरी राहिली नाही, तर सर्व काही तिच्या वडिलांना सांगेन, असंही रिनाच्या बहिणीने खडसावलं.

d4e59f8ae5589840b03d673b69f4b15f948b7

यानंतर रिना थेट अमिरच्या घरी आली, आमिरच्या कुटुंबियांनी रिनाला आनंदाने स्वीकारले, पण रिनाच्या वडिलांना या लग्नाचा राग आला, त्यांची तब्येत इतकी खराब झाली की त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

8390396500f18b18a17e6dbf136d3b426036a

आमीरने या कठीण काळात रिनाला साथ दिली आणि त्यानंतर वडीलांची सेवा करण्यासाठी रुग्णालयात जाऊन तिथे मन जिंकले, यानंतर दोघेही आनंदाने एकत्र राहू लागले आणि दोन मुलांचे पालकही बनले.

 

रिना आणि अमिरचा लग्न खूप वर्षे टिकले. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला, घटस्फोटानंतर आमिरने 2005 मध्ये किरण रावशी पुन्हा लग्न केले, त्यांची भेट ही लगान चित्रपटाच्या सेटवर झाली होती, त्यावेळी किरण सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments