फेमस

Amir khan and kiran rao : राज परिवारातील किरण राव कशी बनवली मिस्टर परफेक्शनिस्टची दुसरी पत्नी…

Amir khan and kiran rao : आमिर खान आणि पत्नी किरण राव यांच्यात घटस्फोट झाला आहे

 

Amir khan and kiran rao : आमिर खान आणि पत्नी किरण राव यांच्यात घटस्फोट झाला आहे, दोघांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र हे दोघे एकत्र कसे आले आणि राजघराण्यातील मुलगी मिस्टर परफेक्शनिस्टची दुसरी पत्नी कशी झाली, हे तितकं कोणाला माहिती नाही, तर तेच आपण जाणून घेणार आहोत.

आमिर आणि किरण यांनी एक पत्र सादर केले आहे, ज्यात दोघांनी विभक्त राहण्याला परस्पर संमती दर्शविली आहे. त्यांच्या निवेदनात, दोघांनीही सांगितले आहे की या दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

दोघांनीही आपल्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात करणार असल्याचे घोषीत केले आहे. त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की पती-पत्नी म्हणून नव्हे तर पालक आणि कुटुंब म्हणून आता इथून पुढे एकत्र राहणार आहोत. आता या दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे, तेव्हा त्यांच्या चाहत्यांनाही आश्चर्य व्यक्त केले आहे, कारण एकदा आमिर खानने किरण रावसाठी पहिल्या पत्नी रिना दत्तापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

प्रत्येकजण असा विचार करीत आहे की दोघांच्यात काय घडले जेणेकरून त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट झाल्याच्या बातमीनंतर त्यांची प्रेमकथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की दोघांमधील प्रेमकथा कशी सुरू झाली आणि मग हे नाते लग्नापर्यंत कसे पोहोचले.

किरण राव आणि आमिर खानची प्रेमकहाणी खूप रंजक आहे. किरणच्या आधी आमिर खानने रिना दत्ताशी लग्न केले होते. पण, रिना आणि आमिर खानचा 2002 मध्ये घटस्फोट झाला. ज्यानंतर किरणच्या रूपाने आमिर खानला दुसरी साथीदार मिळाली. आमिर खानने स्वत: किरण रावसोबतच्या आपल्या प्रेमकथेविषयी खुलासा केला होता.

एका मुलाखतीत आमिर खानने सांगितले होते की ‘2001 ची गोष्ट आहे, जेव्हा मी लगान करत होतो, त्यावेळी किरणशी माझी पहिली भेट झाली. त्या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शकांपैकी एक किरण होती. त्यावेळी आमच्यात काही संबंध नव्हता. पण, रिनाने घटस्फोट घेतल्यानंतर आम्ही पुन्हा भेटलो. एक दिवस मला तिच्याकडून फोन आला आणि आम्ही जवळपास अर्धा तास बोललो. यानंतर मी जेव्हा फोन ठेवला तेव्हा मला समजले की जेव्हा मी तिच्याशी बोलत होतो, तेव्हा मला खूप आनंद वाटत होतो. त्यानंतर आम्ही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. लग्नाआधी आम्ही जवळपास दीड वर्षे एकत्र राहिलो आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आमिर खानने 2005 मध्ये किरण रावशी लग्न केले होते. दोघांनाही एक मुलगा आहे. ज्याचे नाव आझाद आहे. किरण बॉलिवूडची एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता आहे. जिने सिक्रेट सुपरस्टार, पेपली लाईव्ह, दंगल, तलाश आणि जाने तू या जाने ना, अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. पण, लग्नाच्या 15 वर्षानंतर आता दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. ज्यामुळे दोघांचे चाहते खूप दु: खी झाले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments