फेमस

Amir Khan Controversies : अमिर खानचे सगळ्यात मोठे वाद, परफेक्शनिस्ट अनेकदा आलाय चर्चेत…

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट चित्रपटांसोबतच अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतो,वाचा संपूर्ण माहिती...

Amir khan controversies :बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आमिर खान हा चित्रपटासोबतच वेगवेगळ्या वादांमुळे नेहमीच चर्चेत असतो.आमिरला जरी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणत असले तरीदेखील अनेक विषयांमुळे तो नेहमीच ट्रोल होत असतो. (Aamir Khan’s biggest argument, perfectionist is often discussed …)

पाच वर्ष असहिष्णुतेनंतर आमिर खान म्हणाला होता की त्याची पत्नी भारतात राहण्यास घाबरत आहे. हे विधान आल्यावर आमिर खानला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. अनुपम खेर, परेश रावल यांच्यासारख्या अभिनेत्यांनी आमिरच्या वक्तव्यावर टीका केली होती. बरेच दिवस हे प्रकरण तापले होते.

अमीरचा आणि शाहरुखचे शीतयुद्ध

आमिर खानने (amir khan) आपल्या कुत्र्याचे नाव ‘शाहरुख’ ठेवले. ज्याने नवीन वादाला जन्म दिला होता. या प्रकरणावर इतका वाद झाला की सोशल मीडियावर आमिरला स्पष्टीकरण द्यावे लागले. यानंतरच शाहरुख (shahrukh khan) आणि आमिर यांच्यात शीतयुद्ध वाढले.

अमिताभ बच्चन यांच्यावर केलेली टिका

2005 मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन (amitabh bacchan) आणि राणी मुखर्जी स्टारर फिल्म ब्लॅकबाबत आमिर खानने खूप वादग्रस्त विधान केले होते. अमिताभ बच्चन यांची भूमिका त्यांच्या डोक्यावर गेली आहे या वक्तव्याबद्दल आमिरवर टीका करण्यात आली होती.

पीके चित्रपटावर निषेध

आमिर खानचा सर्वात वादग्रस्त चित्रपट होता ‘पीके’ (PK) . 2018 मध्ये आलेल्या या चित्रपटासंदर्भात आमिर खानला बर्‍याच विरोधाचा सामना करावा लागला होता. आमिरच्या न्यूड पोस्टरमुळे आणि हिंदू धर्माची खिल्ली उडवल्यामुळे आमिर निशाण्यावर होता. तेव्हा त्याचे पोस्टर्स बर्‍याच ठिकाणी जाळण्यात आले.

मुलीसह फोटो झाला प्रचंड ट्रोल

काही महिन्यांपूर्वी आमिरने आपली मुलगी इरा खानसोबतचा (Ira khan) एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. बर्‍याच लोकांनी या फोटोवर अश्‍लील टिपण्या देण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर रमजान महिन्यासाठी फोटोवरील कमेंट्स दिल्या होत्या. फोटोमध्ये इरा पापाच्यावर बसून दोघे मजा करताना दिसले. ट्रोलर्सना हा फोटो आवडला नाही. दोघांनीही इराच्या कपड्यांचा आणि रमजान महिन्याचा संदर्भ देत अनेक अश्लील कमेंट्स करण्यास सुरवात केली.

भावासोबत मतभेद
आमिर खानचा भाऊ फैजल खान (Faisal khan)  यांनी आमिरवर पैशाच्या व्यवहारावरून त्यांचा अपमान केल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता. हा मुद्दा खूप चर्चेचा विषय बनला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments