फेमस

AMIR KHAN : आईवडिलांच्या ब्रेकअपनंतर मुलगी ईरा खानचा बॉयफ्रेंडसोबत लूक

आमिर खान आणि किरण यांची मुलगी ईरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत मुंबईच्या वांद्रेमध्ये स्पॉट झाली. पहिल्यांदाच नुपूरसोबत सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे.

amir khan : आमिर खान आणि किरण यांची मुलगी ईरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत मुंबईच्या वांद्रेमध्ये स्पॉट झाली. पहिल्यांदाच नुपूरसोबत सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. 1625648033338

दोघेही एकमेकांचे हात पकडून रस्त्याने चालत होते. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी बर्‍याच दिवसांपासून येत होती. त्यात दोघे एकत्र दिसल्याने त्यांच्या या नात्याचा उलघडाही आता झाला आहे. या दोघांच्या नात्याबद्दल अमिर खान आणि किरण यांनाही माहिती आहे.20210707 142541

आज ते दोघे वांद्रे येथे खरेदीसाठी आले होते. या दरम्यान नुपूर शिखरे अतिशय कॅज्युअल लूकमध्ये दिसला होता, त्याने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पांढरा शॉर्ट्स घातलेला होता. तर तिथे आयरा लांब स्कर्टमध्ये दिसली होती.20210707 142608

2 दिवसांपूर्वी आमिर खानने दुसरी पत्नी किरण रावपासून घटस्फोटाची घोषणा केली होती, त्यानंतर आयराच्या पोस्टने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. पोस्टमध्ये एक फोटो शेअर करत आयराने लिहिले होते की आता पुन्हा हे सगळं एकत्र होईल काय?  नुपूर शिखर हा आमिर खानचा फिटनेस ट्रेनर देखील आहे, आणि लॉकडाऊन दरम्यान, आयरा आणि त्याच्यात जवळीक वाढली होती. त्यानंतर या दोघांच्या अफेअरबाबत चर्चा सुरू होती.20210707 142700

लॉकडाउननंतर नुपूर शिखरे अनेकदा आयराच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिसत होता. सर्वांनी एकत्र मुंबईबाहेर नवीन वर्ष साजरे केले. आणि आता या फोटोंनी दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचंही म्हटलं जातय.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments