खूप काही

Ashish shelar : 26 जुलैच्या विषयावरुन भाजपा आमदार आशिष शेलार यांचा हल्लाबोळ

26 जुलै 2005 च्या त्यापुराला आज 16 वर्ष उलटून देखील मुंबईची परिस्थिती काही बदलली नाही.

Ashish shelar :आज 26 जुलै दुर्दैवाने मुंबईकरांच्या कायमचा लक्षात राहणारा दिवस आहे कारण ती भयानक परिस्थिती मुंबईकरांच्या मनातून कधी जाणार नाही. 26 जुलै 2005 च्या त्यापुराला आज 16 वर्ष उलटून देखील मुंबईची परिस्थिती काही बदलली नाही.

मात्र एवढे वर्ष सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईकरांशी गद्दारी आणि फितुरी केल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलाय. त्यामुळे मुंबईची स्थिती अशी आहे की, दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचं छप्पर” असा सनसनाटी टोला भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेला लगावला आहे.

कोकण आणि साताऱ्यातील परिस्थिती आपण पाहत आहोत. चिखलाचे डोंगर, मृत्यूचं थैमान हे पाहून मुंबईत शिवसेनेला काही करावं असं वाटतं नाही. कधी 20 हजार तर कधी 30 हजार कधी 35 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला गेल्या 16 वर्षात सरासरी 20 हजार कोटींचा अर्थसंकल्प जरी धरला तर 16  वर्षात 3 लाख 20 हजार कोटीचा अर्थसंकल्पीय निधी खर्च मुंबईकरांसाठी केला. मात्र खर्च करून चित्र काय आहे? हे आपणा सर्वांनाच माहित आहे मग एवढा निधी गेला कुठे सत्ताधारी शिवसेनेला याचं उत्तर द्यावं लागेल असा प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी आणि केला आहे.

चितळे कमिटी, आयआयटीच्या अहवालाचं काय झालं? त्यावेळी चितळे समितीने ज्या शिफारशी केल्या होत्या त्याचे काय झाले?  मुंबईतले पानलोट क्षेत्र मोजलंय का? मिठीनदीवरील अतिक्रमण हटवलं का? पम्पिंग स्टेशनचं काय झालं? आयआयटी पवईचा अहवाल पाण्यात बहुदा भिजून गेला.  या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सत्ताधीशांना द्यावी लागणार आहेत. जनतेकडून शिवसेनेकडे हिशोब मागण्याचं काम भाजप करेल असा हल्लाबोल करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या धारेवर धरले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments