खूप काही

Bhaskar jadhav : राणेंसारखी मुलं कोणाच्या पोटाला जन्माला येऊ नयेत, सेना आमदारांची टीका

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी देखील नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत, असं फटकळ भाष्य भास्कर जाधव यांनी केलं आहे.

Bhaskar jadhav : कोकण दौरा दरम्यान नारायण राणे यांचा अधिकाऱ्यांना झापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नारायण राणे चांगलेच चर्चेत आले होते, त्यात आता नारायण राणेंना माध्यमांनी मोठे केले आणि शिवसेना सोडल्यापासून शिवसेनेला शिव्या देऊन त्यांनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं, यापेक्षा नारायण राणे यांनी काहीही केले नाही. शिवसेनेच्या प्रगतीमध्येही नारायण राणे यांचा काडीचा हातभार अशी टीका शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

नारायण राणेंचे दोन्ही मुलं आमदार नितेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे हे नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. त्यामध्येच आता माजी खासदार निलेश राणे हे नेहमीच त्यांच्या फटकळ वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यावरून अनेकदा राजकीय वर्तुळात वाद देखील निर्माण झाले आहेत. यांच्यावर टीका करत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी देखील नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत, असं फटकळ भाष्य भास्कर जाधव यांनी केलं आहे.

नारायण राणे यांनी स्वतःचा पक्ष काढला, परंतु त्यांचा वर्धापन दिन साजरा करण्याऐवजी वर्षश्राद्ध घालून मोकळे झाले, नारायण राणे हे स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत. ते काय शिवसेनेला शिव्या देणार आणि कसली पाळंमुळं रोवणार, “नारायण राणे यांनी शिवसेना जेव्हा सोडली तेव्हा त्यांच्यासोबत केवळ नऊ आमदार गेले होते, परंतू दुसर्‍या निवडणुकीमध्ये त्यांचा एकही आमदार निवडून आला का? तर पुढच्या निवडणुकीत ते स्वतः तरी निवडून आले का? त्यांचा मुलगादेखील पुन्हा निवडून आला का? ते वांद्रे येथून उभे राहिले, तेव्हा निवडून आले का? असे प्रश्न विचारत भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांना विचारले आहेत. त्यामुळे  राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments