आपलं शहर

Blood Shortage : मुंबईत रक्ताचा तुटवडा, चिंताजनक परिस्थिती, पालिकेचं प्लॅनिंग काय?

Blood Shortage : गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या शस्त्रक्रिया आणि लसीकरणामुळे मुंबईत तीव्र रक्ताची तुटवड्याची समस्या जाणवत आहे.

Blood Shortage : गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या शस्त्रक्रिया आणि लसीकरणामुळे मुंबईत तीव्र रक्ताची तुटवड्याची समस्या जाणवत आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेचे प्रभारी डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात सध्या फक्त 22 हजार युनिट रक्त साठा आहे. तेच आधी 40 ते 50 हजाराहून अधिक युनिट रक्तसाठा असायचा. तर मुंबईत केवळ 3,200 युनिट एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. जो 5000 एवढा असतो. कोरोना लसीकरणामुळे सध्या रक्ताच्या साठ्यामध्ये तुटवडा जाणवत आहे.”

“तसेच ज्या लोकांना लस दिली जाते, ते लोक 14 दिवसांपर्यंत रक्तदान करू शकत नाहीत. त्यामुळे साठा उपलब्ध करण्यात अडथळा निर्माण होत आहे.” असे डॉ. थोरात यांनी सांगितले.

रक्तशिबिरांची गरज

राज्य रक्त  संक्रमण परिषदेने रक्तपेढ्या आणि इतर संस्थाना सामूहिक शिबीर आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. आपण सर्वांनी मिळून याला प्रतिसाद देखील दिला पाहिजे असे मतदेखील डॉ. थोरात यांनी मांडले आहे.

जेजे हॉस्पिटलचे प्रभारी डॉ. हितेश पगारे यांच्या म्हणण्यानुसार, “रूटीन शस्त्रक्रिया वाढल्याने रक्ताची मागणी वाढली आहे. तसेच आता टप्प्याटप्प्याने नियम देखील शिथिल होत असल्याने, रुग्णालायचे कामकाज देखील नियमित सुरु झाले आहे. रक्ताची मागणी वाढली आहे, मात्र रक्तदान न वाढल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं पगारे म्हणतात.

जेजे हॉस्पिटलमध्ये दरमहा 2,500 युनिट रक्त लागते. पण आता 1,500 युनिट एवढे रक्त मिळत आहे. तसेच याचा सगळ्यात जास्त फटका हा थ्यालेसिमियाच्या रुग्णांना बसला आहे. कारण या रुग्णांना आठवड्यातून दोनदा रक्त बदलावे लागते. पण, त्यांनाही या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

रक्ताची उपलब्धता

रक्तपेढी युनिट (9 जुलैपर्यंत)
केइएम 56
सेंट जॉर्ज 04
जेजे 54
भाभा 14
नायर 116
जिटी 18
सायन 17
कुपर 58
बिडीबिए 16
टाटा 366
वी.एन. देसाई 17

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments