आपलं शहर

bmc water cut in mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; मंगळवारी ‘या’ भागांमध्ये होणार पाणी कपात

bmc water cut in mumbai : महानगरपालिकेने मुंबईकरांना एक महत्वाची सुचना दिली आहे.

bmc water cut in mumbai : महानगरपालिकेने मुंबईकरांना एक महत्वाची सुचना दिली आहे. पालिकेच्या सूचनेअनुसार, 3 ऑगस्ट रोजी मुंबईच्या काही भागात पाणी वितरीत करणाऱ्या पाईपलाईन्सच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळेच येत्या मंगळवारी मुंबईमधील काही भागांमध्ये पाणी कपात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

तसेच या दुरुस्तीच्या कामाची अवधी जास्त असल्याने, संबंधित भागातील नागरिकांना 14 तास पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. या भागांमध्ये सकाळी 8:30 ते रात्री 10:30 उशिरापर्यंत पाणीपुरवठा बंद असेल.

तसेच मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून आणि काळजीपूर्वक करावा, असे ट्विट देखील मुंबई महानगरपालिकेने केले आहे. के-पुर्व आणि पी-दक्षिण मधील काही भागात, मंगळवारी कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होईल असे महानगरपालिकेने म्हटले आहे.

जाणून घेऊ कोणते आहेत ते भाग :

अंधेरी (पूर्व,पश्चिम), राम मंदिर, कुर्ला, घाटकोपर आणि गोरेगाव या भागांमध्ये पाणी कपात असणार आहे. तसेच मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील सर्व वॉर्ड, एफ उत्तर आणि एफ दक्षिण वगळता, दिवसभरात 15 टक्के पाणी कपात असेल असे महापालिकेने म्हटले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments