फेमस

Bollywood actors :’ट्रेजिडी किंग’ यांचे निधन, बॉलिवूडच्या सौदागरने सोडली जगाची साथ

'ज्वार भाटा' चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेमा सृष्टीत पदार्पण करणाऱ्या दिग्गज कलाकाराने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आपला अखेरचा श्वास सोडला.

Bollywood actors :हिंदी चित्रपट सृष्टीतील ‘ट्रेजिडी किंग’ (Tragedy King DilipKumar) अभिनेता दिलीप कुमार यांचे बुधवारी, 7 जुलैरोजी सकाळी साडेसात वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये (Hinduja Hospital in Mumbai) निधन झाले आहे. त्यांचे वय वर्ष 98 होते. 29 जूनपासून श्वसनाचा त्रास होत असल्याने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांच्यासोबत सावली सारख्या उभ्या असणाऱ्या सायरा बानो यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच सिनेमासृष्टी वरही सर्वत्र शोककळा पसरली आहे. (Bollywood’s saudagar dilip kumar leaves the world)

दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद रसूल खान होते, यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी भारतातील पेशावर येथे झाला होता. चित्रपट सृष्टीत एका निर्मात्याच्या सांगण्यावरून त्यांनी आपले नाव बदलले होते आणि जगाला दिलीप कुमार या नावाने ओळख पटवून दिली होती.

जवळपास 1940-70 तब्बल तीन दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली. 1944 मधील ‘ज्वार भाटा’ चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेमा सृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘ मिलिन’ हा चित्रपट सुपर हिट ठरला. एकामागे एक असे सुपरहिट सिनेमा त्यांनी केले आहेत. दिलीप कुमार यांची विविध ओळख होती, आपल्या कारकिर्दीत त्यांनी शाहिद, मेला, अंदाज, बाबुल, देवदास ,मधुमती कोहिनूर, गोपी ,शक्ती ,कर्मा, सौदागर ,यासारखे अनेक हिट सिनेमे केले आहेत.

भारतीय सिनेमासृष्टीत अनेक नामांकित कलाकारांनी त्यांना आपला आदर्श मानला. अनेक कलाकारांनी तर त्यांची नक्कल करून बॉलिवूडमध्ये काम देखील सुरु केले.

अशा दिग्गज कलाकाराने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आपला अखेरचा श्वास सोडला. मुंबईतील सांताक्रुज स्मशानभूमीत दिलीपकुमार यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments