फेमस

Bollywood:अजय देवगनचा हा सिनेमा होणार ओटीटीवर रिलीज, तारीखही झाली डिक्लेअर

Bollywood:नुकताच अर्जुन कपूर आणि सैफ अली खानचा चित्रपट ‘भूत पोलीस’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार्‍या दुसर्‍या चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

Bollywood:नुकताच अर्जुन कपूर आणि सैफ अली खानचा चित्रपट ‘भूत पोलीस’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार्‍या दुसर्‍या चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले आहे. हा अजय देवगणचा आगामी चित्रपट “भुज: द प्राइड ऑफ इंडिया” (bhuj: the pride of india) आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी माहिती देताना निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. ‘भुज: दि प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगून निर्मात्यांनी चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि दोन लूक पोस्टर्स प्रसिद्ध केले आहेत.

अजय देवगनने आपल्या ट्विटर हँडलवर चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि लूक पोस्टर शेअर केले आहेत. या पोस्टरमध्ये अजय देवगन, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि अ‍ॅमी विर्क दिसत आहेत. “1971 ची आतापर्यंतची सर्वात मोठी लढाई” असे त्यांनी या चित्रपटाला नाव दिले आहे.

या आगामी चित्रपटात नोरा फतेही आणि शरद केळकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक दुधैय्या यांनी केले आहे. ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगण स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिकची भूमिका साकारत आहे.

चित्रपटाची कथा अभिषेक दुधैया, रमण कुमार, रितेश शाह आणि पूजा भवोरिया यांनी संयुक्तपणे लिहिली आहे. हा चित्रपट 13 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments