फेमस

Bollywood News : अक्षयचा चित्रपट लवकरच येतोय, 80 व्या दशकातील सगळ्यात मोठी कहानी

लॉकडाऊननंतर अक्षय कुमारचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Bollywood News : अभिनेता अक्षय कुमार यांचा बराचकाळ सुरू असलेल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ चित्रपटाची तारीख आज शनिवारी (31 जुलै) जाहीर करण्यात आली आहे. बरेच दिवस चाहते बेल बॉटम चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेरीस बेल बॉटम हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. कोरोनामुळे जारी केलेल्या लॉकडाऊननंतर अक्षय कुमारचा हा पहिलाच चित्रपट आहे.(This is Akshay Kumar’s first film after the lockdown released by Corona.)

अजित तिवारी हे ‘बेल बोटम’ चित्रपटाचे दिग्दर्शक असून अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग कोरोना काळात झाली असून कोरोना नियमांचे पालन करून कामकाज पूर्ण केले आहे.

चित्रपटाची शूटिंग हे परदेशांत झालेली असून अनेक परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. आधीच उशीर झाल्याने जास्त वेळ न लावता अभिनेत्याने डबल शिफ्ट करून या चित्रपटात काम केले आहे. तब्बल 18 वर्षांनी अक्षय कुमार यांनी डबल शिफ्ट करून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. आपल्या सहकाऱ्यांना आणि निर्मात्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून डबल शिफ्ट केल्याचे समोर आले आहे, याचे सर्वांनाच कौतुक वाटतं आहे.

अक्षय व्यतिरिक्त कियारा अडवानी, हुमा कुरेशी, वाणी कपूर, लारा दत्ता या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाची निर्मिता वासू भगानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिषा अडवाणी आणि निखिल अडवाणी यांनी केली आहे. बेल बॉटम हा चित्रपट 80 च्या दशकातील एका सत्य घटनेवर आधारित बनवला आहे.

अक्षय कुमारने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला ‘बेल बॉटम’ हा चित्रपट 19 ऑगस्ट 2021 रोजी रिलीज होणार असून लॉकडाऊन नंतरचा हा पहिला चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तुमच्या प्रतिकक्षेची वेळ आता संपली असे चाहत्यांना व्हिडीओत सांगितले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments