फेमस

Bollywood News:मीका सिंगची गाडी मध्य रात्री बंद तरीही रात्री मीकाला बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी

Bollywood News:मुंबईच्या पावसात पहाटे तीन वाजता गाडी बंद पडल्याने मिका सिंह आणि आकांक्षा पुरी मुंबईच्या पावसात अडकले होते.

Bollywood News:रविवारी रात्री गायक मिकासिंगची मदत करण्यासाठी शेकडो चाहत्यांनी हजेरी लावली. पापाराझीने अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली, मिकाने मदतीसाठी हजर झालेल्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

मिका सिंहसोबत आकांक्षा पुरी हे दोघेही एका लग्नातून येत होते, त्यादरम्यान त्यांच्या गाडीमध्ये बिघाड झाला आणि सकाळी 3 वाजता भर रस्त्यात त्यांची गाडी बंद पडली. ही गोष्ट चाहत्यांना समजताच आसपासच्या चाहत्यांनी त्याला मदतीसाठी हजेरी लावली, अशातला एक व्हिडीओ आता समोर आला आहे. मदतीसाठी आलेल्या चाहत्यांचे मिक्काने आभारही माणले आहेत. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

मिका आणि आकांक्षा गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा खूप व्हायरल होत आहेत. त्यात त्यांची रिंग सेरेमनीही झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आकांक्षाने यावर आपलं मत मांडलं आबहे. “मीका आणि मी मागील 12 वर्षांपासून एकमेकांना चांगलं ओळखतो. तो माझ्या कुटूंब सदस्यासारखा आहे, तो नेहमी माझ्या मदतीला येत असतो. आमच्यात खूप चांगलं नात आहे. मात्र आमच्यात मैत्रीव्यतिरिक्त सध्या कुठलच नात नाही, आम्ही याबद्दल अजून विचारही केला नसल्याचं आकांक्षाने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं..

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments