फेमस

BOLLYWOOD UPDATE : Raj Kundra ‘या’ कंपनीसाठी करत होता पॉर्नोग्राफी, मुंबई पोलिसांचा खुलासा

BOLLYWOOD UPDATE : राज कुंद्राच्या बाबतीत दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत असल्याने त्याच्यावर आणखी एक मोठा आरोप करण्यात आला आहे.

BOLLYWOOD UPDATE : मुंबई पोलिसांनी मुलींना फसवून पॉर्न चित्रपट तयार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचं नाव देखील समोर आलं आहे. परिणामी पोलिसांनी त्याला अटक केली. राज कुंद्राला अटक झाल्यापासून या प्रकरणात सतत नवनवे खुलासे होत आहेत. दरम्यान पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार राजची कंपनी लंडनमधील एका चित्रपट कंपनीसाठी पॉर्नग्राफीची निर्मिती करत होती.

शिल्पा शेट्टीची भूमिका काय

वरिष्ट पोलीस अधिकारी मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार राजच्या वियान इंडस्ट्रीज कंपनीचे संबंध लंडनमधील केनरिन या कंपनीसोबत आहेत. ही कंपनी हॉटशॉट नावाचं एक ॲप चालवते. या ॲपला कंटेंट पुरवण्याचं काम राज कुंद्रा करत होता. पोलिसांच्या हाती काही वॉट्सअप चॅट आणि इमेल्स लागले आहेत. आणि या पुराव्यांच्या आधारावरच त्याला अटक करण्यात आली असून सध्या पोलीस या प्रकरणाची आणखी चौकशी करत आहे.

काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती, तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला झाला. त्यावेळी राज कुंद्राचे नाव समोर आले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments