फेमस

Bollywood:पहिल्या पत्नीचे पत्र वाचून रडला होता अमिर खान, पाहा काय होतं पत्रात

Bollywood:अभिनेता आमिर खान याने त्याच्या दुसऱ्या पत्नी किरण राव सोबत घटस्फोट घेतला आहे

Bollywood: अभिनेता आमिर खान याने त्याच्या दुसऱ्या पत्नी किरण राव सोबत घटस्फोट घेतला आहे, दोघांच्याही सहमतीने हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पहिली पत्नी रिनासोबत काडीमोड घेतल्यानंतर आमिरने किरण रावसोबत लग्न केले होते. किरण आणि अमिर यांच्या संसाराला 15 वर्ष झाली आहेत, त्यानंतर दोघांनी हा निर्णय घेतला आहे.

आमिरच्या ‘लगान’ चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण झाली, या चित्रपटाला भरपूर यश मिळालं होतं. हा चित्रपट आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शन केला होता, तर या चित्रपटाला ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’साठी ऑस्कर नामांकनही मिळालं होतं. हा चित्रपट ऑस्कर जिंकू शकला नसला, तरी इतर सर्व पुरस्कार या चित्रपटाने जिंकले आहेत.

लागण चित्रपटात अमिर आणि किरणची भेट झाली. या चित्रपटातल्या बऱ्याच आठवणी अमिर अनेकदा शेअऱ करत असतो. सर्वात खास क्षण म्हणजे या चित्रपटानंतर जेव्हा त्याला पहिली पत्नी रिनाने पत्र पाठवलं होतं, त्याबद्दलही तो अनेकदा सांगत असतो.

काय होतं पत्रात

आमिरला रिनाने एक पत्र लिहलं होते, ते वाचून अमिर खूप रडला होता, त्याचा म्हण्यानुसार रिनाने खूप मेहनतीने मेकिंगच्या गोष्टी शिकल्या होत्या, ती खूप स्ट्रीक्ट निर्माती होती, सर्वांना अतिशय धाकात ठेवायची. माझ्यावरही ती ओरडायची, चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तिने मला एक पत्र लिहलं, ते खूप भावूक करणारं होतं, तिने खूप कठीण काळात हा चित्रपट केला होता. त्या पत्रात तिने सगळ्यांचे आभार मानले, अमिरनेहे सांगितलं की त्याला ते संपूर्ण पत्र आठवत नाही, पण तिने चित्रपट शेत्रातील पार्श्वभूमी नसताना जे काम केलं ते खूप महान होतं.

लगाण चित्रपटात अमिर आणि किरण जवळ आले, त्यामुळे अमिरने रिनाशी काडीमोड देऊन किरणशी लग्न केलं, हे सगळ असूनही लगाण बॉक्सऑफिसवर (boxoffice) वर खूप चांगला चालला, लागणसारख्या दुसऱ्या कोणत्याही चित्रपटाला संगीत नाटक बॅकग्राऊंड आणि कथा असा चित्रपट पुन्हा झाला नाही, लगाणचा रेकॉर्ड अजून कोणीही मोडला नाही आहे, आमिर खान प्रॉडक्शन्स पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक मारली होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments