फेमस

Bollywood:23 वर्षीय जाह्नवी कपूरने घेतलं जुहमध्ये 39 कोटीचं घर.

Bollywood:जाह्नवी कपूरने ( Janvhi Kapoor ) जुहमध्ये 39 कोटीचे अपार्टमेंट (Appartment) विकत घेतले आहे.

Bollywood:जाह्नवी कपूरने ( Janvhi Kapoor ) जुहमध्ये 39 कोटीचे अपार्टमेंट (Appartment) विकत घेतले आहे.

वय वर्षे 23 असलेली जाह्नवी कपूरने नुकताच ‘रूही ‘(Ruhi) चित्रपटात अभिनय केला होता, त्या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसला होता, पण तो चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी केली नाही, पण आपण जाह्नवी कपूरच्या चित्रपटाबद्यल नाही, तर तिने नवीन घेतलेल्या घराबदल बोलत आहोत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार जाह्नवी कपूरने जुहमध्ये 39 कोटी रुपयांचे अपार्टमेंट विकत घेतलं आहे.
जाह्नवी कपूर तिचे वडील फिल्ममेकर बोनी कपूर आणि बहीण ख़ुशी बरोबर लोखंडवालाच्या घरात राहत होती,मात्र आता ती नवीन अपार्टमेंटमध्ये आलिशान आणि स्पेशियस (Spacious) आयुष्य जगणार आहे . त्या अपार्टमेंटची कारपेट एरिया (Carpet Area) 4144 स्क्वेअर फूट (Square Foot) आहे, हा एक ट्रिपलेक्स अपार्टमेंट आहे, जो मुंबईच्या जुहू – विलेपारलेमध्ये आहे, जाह्नवी कपूरचा हा अपार्टमेंट 14, 15 वा आणि 16 आहे.

जाह्नवी कपूरच्या ह्या अपार्टमेंटजवळ दिग्गज कलाकार अजय देवगन, अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांचा शामियाना आहे, म्हणजे जाह्नवी कपूर या सगळ्या अभिनेत्यांची शेजारीण झाली आहे.

जर आपण जान्हवीच्या करिअर बद्दल बोललो, तर जान्हवी कपूरने तिच्या करिअरची सुरूवात ‘धडक’ या चित्रपटाने केली. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेत्रीची आई श्रीदेवी यांचे निधन झाले होते आणि तिला आपल्या मुलीचा डेब्यू फिल्म पाहता आला नव्हता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments